व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला मागून धडक, १७ वर्षीय आदिवासी तरुणाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 1, 2026
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळा, दि. 1 मे ( प्रतिनिधी ) : लोणावळा शहरात गुरुवारी ( दि. 30 एप्रिल ) सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बोअरवेलच्या गाडीने दुचाकीला मागून धडक दिल्याने १७ वर्षीय आदिवासी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त आदिवासी बांधवांनी महामार्ग रोखून आंदोलन केल्याने तब्बल पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती. रात्री १२.३० वाजता पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळवले.

मृत तरुणाचे नाव मनिष पिंट्या वाघमारे (वय १७, रा. कुने नामा ठाकरवाडी) असे असून, या अपघातात अक्षय कोळी हा तरुण जखमी झाला आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी लोणावळ्याच्या दिशेने जात असताना बोअरवेलच्या गाडीने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की मनिष वाघमारे याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर परिसरातील आदिवासी तरुण-तरुणींसह अनेक बांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले.

मृत तरुण आदिवासी समाजातील असल्यामुळे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संतप्त जमावाने महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला परिस्थिती तणावपूर्ण होती; मात्र पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली व अखेर मध्यरात्री १२.३० वाजता वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, संबंधित वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोणावळा पोलीस करत आहेत.


dainik maval jahirat

Previous Post

मिसिंग लिंक प्रकल्प मावळसाठी ठरणार वरदान ! लोणावळा – खंडाळा भागातील वाहतूक कोंडी कमी होणार

Next Post

शुक्रवार ठरला घातवार ! मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Friday turned out to be a disaster 4 people drowned in two separate incidents in Maval taluka

शुक्रवार ठरला घातवार ! मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.