व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मिसिंग लिंक प्रकल्प मावळसाठी ठरणार वरदान ! लोणावळा – खंडाळा भागातील वाहतूक कोंडी कमी होणार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प एक मे पासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 1, 2026
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Missing Link project will be a boon for Maval Traffic congestion in Lonavala Khandala area will be reduced

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आजपासून अर्थात महाराष्ट्र दिनापासून (एक मे ) वाहतुकीसाठी खुला झाला आहे. दुपारी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री, अधिकारी आदींच्या उपस्थितीत द्रुतगती मार्गावरील या मिसिंग लिंकचे लोकार्पण करण्यात आले.

दरम्यान या नवीन मिसिंग लिंक मुळे मावळ तालुक्यातील लोणावळा आणि खंडाळा परिसरातील नागरिकांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे. सोबत तालुक्यातील पर्यटन व्यवसाय, हॉटेल उद्योग, खाद्यपदार्थ व्यवसाय आणि स्थानिक रोजगारालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बोरघाटात सतत वाहतूक कोंडी, अपघात, दरड कोसळणे आणि संथ वाहतुकीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त झालेल्यांसाठी हा नवा रस्ता फायद्याचा ठरणार आहे. द्रुतगती मार्गावर खोपोली ते कुसगाव दरम्यानचा घाट विभाग हा धोकादायक मानला जातो. तीव्र उतार, नागमोडी वळणे आणि वारंवार अपघात यामुळे या भागाला ‘डेंजर झोन’ म्हणून ओळख मिळाली होती. त्यावर ‘मिसिंग लिंक’मुळे प्रकल्प उपाय ठरू शकतो.

सुट्टीच्या दिवशी, विशेषतः शनिवार-रविवार आणि पावसाळ्यात लोणावळा शहरात वाहनांच्या रांगा लागतात. त्यातच द्रुतगती मार्गावर खोळंबा झाल्यास अनेक वाहने लोणावळा शहरातून पर्यायी मार्ग शोधत जातात. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर ताण निर्माण होतो. खोपोली ते लोणावळा मार्गावर स्थानिकांनाही त्रास होतो. पण, आता ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर घाटातील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. तसेच मुंबई आणि पुण्यातून पर्यटक कमी वेळेत लोणावळ्यात पोहोचू शकणार आहेत.

स्थानिकांना होणारे फायदे
– वाहतूक कोंडीतून सुटका व वेळेची बचत होणार
– ​खोपोली ते लोणावळा प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होईल
– ​दरडींसारख्या सारख्या नैसर्गिक आपत्तींपासून सुटका
– ​आर्थिक आणि पर्यटन विकास व पर्यटनाला गती
– ​स्थानिक व्यवसायास चालना

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज ‘महाराष्ट्र दिनी’ होणार लोकार्पण
– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून लोणावळा बसस्थानकाची पाहणी
– ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला चालना
– मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला


Previous Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज ‘महाराष्ट्र दिनी’ होणार लोकार्पण

Next Post

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

house of widow Shalan Dahibhate in Bedse Maval was gutted in fire caused by short circuit

एक वर्षापूर्वी पतीचे निधन, आता आगीत घर जळून खाक ; बेडसे गावातील शालन दहिभाते यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

May 20, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

पुणे-मुंबई महामार्गालगत वेश्या व्यवसाय तेजीत ! तळेगाव, वडगाव, देहूरोड, सोमाटणे हद्दीत अनेक अड्डे ; पोलिसांचे पाहूनही दुर्लक्ष

May 20, 2026
ECI Central Election Commission

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
fadnvis shinde pawar

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

May 19, 2026
Pune District Collector Jitendra Dudi

पुणे जिल्ह्यात धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

May 19, 2026
आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.