Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरात तरुणाचा दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात आरोपींनी तरुणाचा खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह व दुचाकी जाळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ही घटना दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास महागाव-धालेवाडी रस्त्यावरील मोकळ्या शेतात उघडकीस आली. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव अमोल अनंता मोहोळ (वय अंदाजे ३७, रा. वारू, ता. मावळ, जि. पुणे) असे असल्याचे समजत आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवनानगर परिसरातील महागाव – धालेवाडी रस्त्यालगत असलेल्या एका शेतात तरुणाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ दुचाकी देखील जळालेल्या अवस्थेत आढळली.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकरणात नेमका खून कोणत्या कारणातून करण्यात आला, तसेच आरोपी कोण आहेत याचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न
– तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा
– सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी
– लोणावळा शहरात ‘व्हिला’ ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

