व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोडमध्ये गोळीबारचा थरार ! भाजपा कार्यकर्त्याची हत्या

पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 29, 2026
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Shooting scare in Dehu Road BJP worker killed

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik maval news : मावळ मतदारसंघातील देहुरोड शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या हल्ल्यात भाजपचे कार्यकर्ते असलेल्या रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून यात एकामागोमाग एक राऊंड फायर केलेत, यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने त्याना जखमी अवस्थेत देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

देहुरोडला गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी जखमी अवस्थेतील रमेश रेड्डी यांना रुग्णालयात नेलं, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. गोळीबारामुळं रमेश रेड्डी यांचा मृत्यू झाला.

पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार देहुरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सवाना चौक येथे अग्निशस्त्र वापरुन एकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचताच रमेश रेड्डी याच्यावर अज्ञात इसमंनी गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं. सवाना चौकातील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रमेश रेड्डीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथकं पाठवली असल्याची माहिती देखील विशाल गायकवाड यांनी दिली आहे.

तपास सुरू – आरोपींचा शोध वेगात
दरम्यान, या प्रकरणातील हल्लेखोर कोण होते? कोणत्या हेतूनं रमेश रेड्डी यांच्यावर गोळीबार झाला, नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या सर्व गोष्टींचा तपास पिंपरी चिंचवड पोलिसांना करावा लागलणार आहे.

रमेश रेड्डीचे नातेवाईक मित्र परिवाराने हॉस्पिटलमध्ये आक्रोश करत जुना पुणेमुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला. पण देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रमेश रेड्डीचा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलवण्यात आलाय, तर रमेश रेड्डीवर हल्ला झाल्याचं कारण पोलीस तपासात समोर येणार आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न
– तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा
– सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी
– लोणावळा शहरात ‘व्हिला’ ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा 


Previous Post

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

Next Post

लोकसेवा हक्क दिनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Aaple Sarkar Seva Kendra inaugurated at Talegaon Dabhade Municipal Council

लोकसेवा हक्क दिनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Municipal Council starts pre-monsoon drain cleaning work

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरूवात । Talegaon Dabhade

April 29, 2026
Dr Babasaheb Ambedkar residence anniversary celebrated with enthusiasm at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान वर्धापन दिन उत्साहात साजरा

April 29, 2026
Aaple Sarkar Seva Kendra inaugurated at Talegaon Dabhade Municipal Council

लोकसेवा हक्क दिनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन । Talegaon Dabhade

April 29, 2026
Shooting scare in Dehu Road BJP worker killed

देहूरोडमध्ये गोळीबारचा थरार ! भाजपा कार्यकर्त्याची हत्या

April 29, 2026
Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.