शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री उशिरा 11 ते 11.30 वाजता एक लहान मुलगा एकटाच जंगलातील जुना मुंबई पुणे हायवेने चालत चालला होता. शिंग्रोबा मंदिरा जवळ एका टेम्पो चालकाने गाडी थांबवली आणि त्याला गाडीत घेतले. त्याच्या मागुन मागील गाडीत असलेल्यांनी ते पाहिले, तो मुलगा सांगत होता की मी एकविरा आई कार्ला इथे चाललो आहे. काही अंतर गेल्या वर एका हॉटेल वर गाडी थांबली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्या मुलाला भुक लागली असावी, गाडी ड्रायव्हरने त्या मुलाला वडापाव घेऊन देत होता. त्या वेळेस मागील गाडीतील राकेश दाभाडे आणि सुरज दाभाडे यांनी पण त्या मुलाची चौकशी केली आणि त्या गाडी ड्रायव्हरला सांगितले की त्या मुलाला पोलीस स्टेशनला देऊन जाऊया. रस्त्यावर कुठेही पोलीस स्टेशन भेटले नाही. गाडी सरळ कार्ला फाटा इथे पोहोचली. ते काही त्या मुलाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले नाही. त्यामुळे राकेश दाभाडे आणि सुरज दाभाडे हे त्यांच्या मागेच होते. त्यांनी त्या मुलाला आपल्या जवळ घेतले व तसेच आपल्याला माहीत असलेले वडगाव मावळ पोलीस स्टेशन ला देऊन गेले.
पोलिसांनी सगळी माहिती विचारली आणि त्यांचा फोन नंबर घेतला व त्यांना सांगितले की तुम्ही त्या मुलाला घेऊन लोणावळा पोलीस स्टेशनला जा, रात्री खूप उशीर झाला होता. तो मुलगा सांगत होता की मला तुमच्या सोबत तुमच्या घरी घेऊन चला. घरी आई वडील कोणीच नाही. मामा व मामी आहे, ते मला मारतील. मी घरी गेलो तर, अशी तो खुप विनंती करत होता.
तो मुलगा काही सांगत नव्हता. नाव सांगत होता पन पत्ता काही सांगत नव्हता. रात्र देखील भरपुर झाली होती. परत लोणावळा ला जाने काही शक्य नव्हते. त्यामुळे त्या दोघांनी त्या मुलाला आपल्या घरी माळवाडी येथे घेऊन जायचा निर्णय घेतला व त्या मुलाला आपल्या घरी घेऊन गेले. विचारपूस केली तेव्हा मुलाने आपले नाव यश केदार गनद्रे असे सांगितले वय 11 पन घरचा पत्ता काही मुलगा काहीच सांगत नव्हता. त्याला जेवायला दिले व झोपवले. ( Maval Disaster Friends have succeeded in locating parents of missing 11 year old boy )
सकाळी उठल्या वर वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे सदस्य, आपदा मित्र, शिवदुर्ग मित्र लोणावळाचे शुभम काकडे यांना फोन करून याची माहिती दिली. तसेच शुभम काकडे यांनी सगळा प्रकार वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना फोन करून सांगितला. निलेश गराडे यांनी लगेच पोलीस स्टेशन ला कळविले व त्या मुलास घेऊन तळेगाव दाभाडे इथे या असे सांगितले व त्या मुलाचा फोटो मागितला. तो फोटो पोलीस ग्रुप वर पाठवला.
तो मुलगा घरी आल्यावर त्या मुला बरोबर थोडे उलट सुलट विचारपूस केली आणि गप्पा मारल्या. नवरात्री असल्यामुळे देवीची आरती सुध्दा मुलांच्या हस्ते केली. मुलाला खुश केले शिवाय फटाके वाजवाय दिले. तेव्हा त्या मुलाने शाळेचे नाव सांगितले आणि खोपोली इथे शाळा आहे, असेही सांगितले. निलेश गराडे यांनी लगेच त्या मुलाचा फोटो व शाळेचे नाव खोपोली येथील सहायक पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर साहेब यांना माहिती पाठवली. नातेवाईक पोलीस स्टेशनलाच बसलेले होते. नातेवाईक यांनी फोन केला. त्यांचा मुलगा सुखरूप आहे अशी माहिती दिली. घरचे लोकेशन त्यांना पाठवले ते पण काही वेळातच खोपोली पोलीस राजेश चव्हाण सर व मुलाचे नातेवाईक आले व त्या मुलास खोपोली येथे घेऊन गेले.
त्यांनी संस्थेचे आभार मानले. सदर शोधकार्यामध्ये शिवदुर्ग मित्र लोनावळा, आपदा मित्र मावळ पुणे व वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे संस्थापक निलेश संपतराव गराडे, शुभम काकडे, विनय सावंत, सत्यम सावंत, अनिश गराडे, राकेश दाभाडे आणि सुरज दाभाडे.
अधिक वाचा –
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । खाद्यपदार्थांच्या व्यवसायाने आला आयुष्यात गोडवा; कष्टप्रद वाटेवरुन चालणाऱ्या रजनीताई कराळेंची संघर्षकहाणी
– नवरात्र आणि भोंडला । ‘जेव्हा महाराष्ट्रात गरबा फक्त गुजराती लोक खेळायचे, तेव्हा मराठी कुटुंबात भोंडला लोकप्रिय होता’
– ग्रामपंचायत निवडणूकांसाठी मावळ भाजपाने कसली कंबर! निवडणूक असलेल्या प्रत्येक गावासाठी नेमले प्रभारी, पाहा यादी