परमिट रूम आणि बिअर बारचे लायसन काढून देतो असे सांगून एका व्यक्तीची 9 लाख 58 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना गहुंजे इथे घडली. जानेवारी 2023 ते 23 ऑक्टोबर 2023 दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी अनंता वसंत बोडके (वय 49 रा. गहूंजे, ता. मावळ) यांनी सोमवारी (दिनांक 23 ऑक्टोबर) रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव पोलिसांत याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 406, 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, नितीन आवटी आणि राज गायकवाड (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ( person from Gahunje village was defrauded of 9 lakh 58 thousand on pretext of obtaining beer bar license )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना बियर बार आणि परमिट रूमचे लायसन्स काढून देतो, असे सांगून फिर्यादी बोडके यांच्याकडून 10 लाख 75 हजार रुपये घेतले. त्यांना बियर बार व परमिट रूमचे लायसन काढून न देता तसेच फिर्यादी यांचे पैसे परत न देता 9 लाख 58 हजार 500 रुपये रकमेची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमुद आहे. सपोनी पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– अत्यंत दुःखद बातमी! ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन
– ग्रामपंचायत निवडणूक : छाननीत अर्ज बाद का होतात? ग्रामपंचायत उमेदवारांसाठी अटी आणि पात्रता काय असतात? जाणून घ्या
– ‘मुलीला नोकरी आणि सरकारी योजनेतून 1 कोटी मिळवून देतो’ असे सांगत महिलेची लाखोंची फसवणूक; तळेगावातील धक्कादायक प्रकार