मावळ तालुक्यात 29 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. ज्यात 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका आणि 10 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका होत्या. यात सार्वत्रिक निवडणूका असलेल्या 19 पैकी 4 गावांची निवडणूक बिनविरोध झाल्याने 15 गावांत रविवारी (दि. 5 नोव्हेंबर) मतदान झाले. आणि पोटनिवडणूकांत बिनविरोध जागा वगळता प्रत्यक्षात 5 गावांत सदस्य पदांच्या पोटनिवडणूकांसाठी मतदान झाले. त्याचीही मतमोजणी आज, सोमवार (दि. 6 नोव्हेंबर) रोजी पार पडली. मतमोजणीची प्रकिया पुर्ण झाल्यानंतर सार्वत्रिक निवडणूक झालेल्या कोंडिवडे (आं.मा.) ग्रामपंचायतीचा अंतिम निकाल समोर आला आहे. ( Maval Taluka Gram Panchayat Election Results 2023 Final Updates Done Grampanchayat )
कोंडिवडे (आं.मा.) ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या 7 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे सदस्य पदाच्या एका जागेसाठी आणि सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. यात सरपंच पदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळाली. प्रत्यक्ष मतमोजणीनंतर,
रुपाली संदीप तळवडे यांना 5, सारिका जालींदर तळवडे यांना 287 आणि राधा विश्वनाथ मुंठाकर यांना 331 मते पडली. त्यामुळे सर्वाधिक मते घेत राधा विश्वनाथ मुंठाकर या सरपंच पदी निवडून आल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रभाग निहाय निकाल (विजयी उमेदवार)
प्रभाग क्रमांक 3
– किरण किसन तळवडे (विजयी – 100 मते)
– दिपक पंढरीनाथ कडू (पराभूत – 95 मते)
मावळ तालुक्यात भाजपा – राष्ट्रवादी समसमान :
मावळ तालुक्यात 19 गावांच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 सरपंच विजयी झाले, तर भाजपाचेही 9 सरपंच निवडणूक आले. आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 1 सरपंच निवडूण आले. ग्रामपंचायत स्तरावर पक्षीय राजकारण असत नाही, परंतू सरपंच पदाचे उमेदवार मात्र कुठल्या ना कुठल्या पक्षाशी जोडलेले असल्याने निवडणूक निकाला नंतर 19 पैकी 1 गाव वगळता उर्वरित 18 पैकी 9-9 गावांत भाजपा – राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होऊन राष्ट्रवादीत आण्णा – भाऊ हे आताच्या निवडणूकीत समसमान राहिल्याचे प्राथमिक चित्र दिसत आहे.
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत डोणे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत शिळींब : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत साळुंब्रे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी