मावळ तालुक्यात 29 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. ज्यात 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका आणि 10 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका होत्या. यात सार्वत्रिक निवडणूका असलेल्या 19 पैकी 4 गावांची निवडणूक बिनविरोध झाल्याने 15 गावांत रविवारी (दि. 5 नोव्हेंबर) मतदान झाले. आणि पोटनिवडणूकांत बिनविरोध जागा वगळता प्रत्यक्षात 5 गावांत सदस्य पदांच्या पोटनिवडणूकांसाठी मतदान झाले. त्याचीही मतमोजणी आज, सोमवार (दि. 6 नोव्हेंबर) रोजी पार पडली. मतमोजणीची प्रकिया पुर्ण झाल्यानंतर सार्वत्रिक निवडणूक झालेल्या शिळींब ग्रामपंचायतीचा अंतिम निकाल समोर आला आहे. ( Maval Taluka Gram Panchayat Election Results 2023 Final Updates Shilimb Grampanchayat )
शिळींब ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या 7 आणि सरपंच पदाच्या 1 जागा अशा 8 जागांसाठी निवडणूक झाली. सरपंच पदासाठी तिरंगी लढत झाली. प्रत्यक्ष मतमोजणीनंतर सरपंच पदी भाजपाचे सिद्धांत उर्फ सनी कडू हे 777 मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे सचिन संभाजी शिंदे यांचा पराभव केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रभाग निहाय निकाल (विजयी उमेदवार)
प्रभाग क्रमांक 1
– विजय चंद्रकांत धनवे
– आश्विनी मुकींद ओव्हाळ
– स्वाती मंगेश ढमाले
प्रभाग क्रमांक 2
– प्रविण हनुमंत चोरघे
– अनिता विलास शिंदे
प्रभाग क्रमांक 3
– अर्चना नवनाथ गोणते
– अरुणा रमेश भिवडे
मावळ तालुक्यात भाजपा – राष्ट्रवादी समसमान :
मावळ तालुक्यात 19 गावांच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 सरपंच विजयी झाले, तर भाजपाचेही 9 सरपंच निवडणूक आले. आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 1 सरपंच निवडूण आले. ग्रामपंचायत स्तरावर पक्षीय राजकारण असत नाही, परंतू सरपंच पदाचे उमेदवार मात्र कुठल्या ना कुठल्या पक्षाशी जोडलेले असल्याने निवडणूक निकाला नंतर 19 पैकी 1 गाव वगळता उर्वरित 18 पैकी 9-9 गावांत भाजपा – राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होऊन राष्ट्रवादीत आण्णा – भाऊ हे आताच्या निवडणूकीत समसमान राहिल्याचे प्राथमिक चित्र दिसत आहे.
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत साळुंब्रे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– सनम शेखने पटकावला मावळ महिला श्री चषकाचा मान; ‘महिला सक्षमीकरण फक्त कागदावरच राहू नये ‘ – संध्या थोरात
– वृद्धाचे अपहरण करून निर्घृण हत्या, बनावट पोलिसाला अटक; मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना