धाराशिव जिल्ह्यात झालेल्या 65 व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील दोन पैलवानांनी चमकदार कामगिरी करत तालुक्याचे नाव संपूर्ण राग्यात गाजवले आहे. मावळ तालुक्यातील सडवली गावातील युवा मल्ल केतन घारे याने सदर स्पर्धेत दमदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. तर, उर्से गावातील राष्ट्रीय खेळाडू पै. संकेत दामु ठाकुर याने 70 किलो मॅट विभागात कांस्य पदक मिळवले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन चंद्रकांत सातकर, राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष व ऑलिंपिकवीर कुस्तीगीर मारूती आडकर, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय कुस्तीगीर संभाजी राक्षे, अध्यक्ष खंडू वाळूंज, सचिव व राष्ट्रीय कुस्तीगीर बंडू येवले, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर शंकर कंधारे, उपाध्यक्ष सचिन घोटकुले, मनोज येवले, सहसचिव व महाराष्ट्र चॅम्पियन पप्पू कालेकर, महाराष्ट्र चॅम्पियन तानाजी कारके, राष्ट्रीय कुस्तीगीर भरत लिमण, निवृत्ती काकडे, नागेश राक्षे, सुरेश आगळमे, धोंडिबा आडकर, विष्णु शिरसाट, संघाचे सल्लागार राजू बच्चे, देविदास कडू यांनी पैलवानांचे अभिनंदन आणि कौतूक केले. ( Maharashtra Kesari Wrestling Tournament Dharashiv Medals to wrestlers Ketan Ghare Sanket Thakur )
अधिक वाचा –
– कौतुकास्पद! मेघराज राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी वसतिगृहाला अन्नधान्याची मदत
– दीपोत्सवाने फिटणार डोळ्यांचे पारणे! तळेगावात रविवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन
– ग्रामपंचायतीची पाणीपट्टी, घरपट्टी वेळेवर भरा, नाहीतर होईल कारवाई? काय आहेत नियम, जाणून घ्या