व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रामपंचायतीची पाणीपट्टी, घरपट्टी वेळेवर भरा, नाहीतर होईल कारवाई? काय आहेत नियम, जाणून घ्या

ग्रामपंचायत ही राज्यव्यवस्थेचा पाया आहे. ती एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर हे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 23, 2023
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Gram-Panchayat

File Image


ग्रामपंचायत ही राज्य व्यवस्थेचा पाया आहे. ती एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर हे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीला शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळत असला तरीही तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो. त्यामुळे अनेकदा कर वसूली नसेल तर ग्रामपंचायती आर्थिक अडचणी येतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ग्रामपंचायतीच्या पट्ट्या भरणे, तसेच काही कर असल्यास ते भरणे हे कोणत्याही सुजान नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतू, अनेकजण तसे करताना दिसत नाही. वर्षोनुवर्षे पाणीपट्टी, घरपट्टी सारखे कर थकवले जातात. परंतू, हे कर चुकवणाऱ्या किंवा वेळेवर भरणा न करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची सुचना आहे. याचे कारण तुम्ही जर ग्रामपंचायतीच्या कराचा भरणा केला नाही तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते.

  • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम (सुधारणा) 2015 यामधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचा कर हा प्रत्येक मालमत्ता धारकाला भरावाच लागतो, तो कधीही माफ होत नाही. तसेच थकबाकी रकमेवर दरवर्षी 5 % व्याजसुद्धा भरावे लागते. तसेच ग्रामपंचायत कराच्या रकमेच्या वसुलीसाठी अशी मालमत्तेची जप्तीसुद्धा करू शकते. आणि अशा कार्यवाहीचा खर्चही वसूल केला जातो.

कर न भरल्यामुळे एक तर आपली कराची रक्कम वाढत जाते, त्यावरील अतिरिक्त दंडही भरावा लागतो, आणि जप्तीसुद्धा होऊ शकते, आणि एव्हढे होऊनही शेवटी कराची रक्कम भरावीच लागते. त्यापेक्षा जर आपण आपला कर दरवर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात भरला तर आपल्याला घरपट्टीच्या चालू रकमेवर 5 % सूट सुद्धा मिळते. मार्चपर्यंत भरला तर दंडही लागत नाही आणि आपण ग्रामपंचायतला कधीही कुठल्याही कामासाठी गेलो तरी कुणी आपल्याला कर भरा म्हणून तगादाही लावणार नाही.

ग्रामपंचायत कर

पाणीपट्टी व घरपट्टी वेळेत न भरल्यास थकबाकीदारांवर खटला दाखल होऊन लोक अदालतीत पाठवला / ग्रामपंचायत अधिनियमानुसार मालमत्तेवर बोजा चढवला जाऊ शकतो.

नियमानुसार कर भरला नाही म्हणुन कोणत्याही दाखल्यासाठी नागरिकांची अडवणूक करता येत नाही.

कर भरणे नागरिकांची जबाबदारी आहे.

— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) November 18, 2023

गावाला दैनंदिन पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे, ब्लिचिंग पावडर खरेदी, वीजबिल भरणे, कर्मचारी पगार करणे, गावातील स्वच्छता, किरकोळ रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे, कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते. घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील व इतर आवश्यक कामे ग्रामपंचतीस करणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपला घरपट्टी, पाणीपट्टी कर,व इतर करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक आहे. कराच्या रूपाने ग्रामस्थ ग्रामपंचायतीला आर्थिकदृष्ट्या बळकट करत असतात आणि त्यातूनच एका सक्षम गावाची निर्मिती होत असते.

अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा पोलिसांची 5 जणांवर कारवाई, जाणून घ्या कारण
– राष्ट्रवादीचे नेते बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन, पाहा ठिकाण आणि वेळ
– मंडल अधिकारी आणि तलाठ्यांना मिळणार हक्काची कार्यालये; तालुक्यात होणार 7 मंडलाधिकारी आणि 43 तलाठी कार्यालये


dainik maval jahirat

Previous Post

स्तुत्य उपक्रम! सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा

Next Post

दीपोत्सवाने फिटणार डोळ्यांचे पारणे! तळेगावात रविवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Deepotsav-Talegaon-Dabhade

दीपोत्सवाने फिटणार डोळ्यांचे पारणे! तळेगावात रविवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.