संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुक्याचे प्रमुख नेते बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ इथे शनिवारी (दि. 25 नोव्हेंबर) हभप निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तनाचे आयोजन केले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती बाबूराव वायकर यांनी ही माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात शनिवारी (दि. 25 नोव्हेंबर) रात्री 9 ते 11 या वेळात हे कीर्तन होणार आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी नागरिकांनी या कीर्तनसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वायकर यांनी केले आहे. ( Nivrutti Maharaj Deshmukh Indurikar Kirtan on occasion of Maval ncp leader Bapusaheb Bhegde birthday )
अधिक वाचा –
– तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनला जाण्याची गरज नाही; आता घरबसल्या मोबाईलवर करा ऑनलाईन तक्रार
– ‘छत्रपती शिवरायांचा एक गुण अंगिकारला तरीही जीवनात यशस्वी व्हाल’, वारंगवाडीमध्ये किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षिस वितरण
– धक्कादायक! कार ओढ्यात कोसळून डॉक्टरचा मृत्यू, मावळमधील चांदखेड येथील घटना