व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 15, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक! कार ओढ्यात कोसळून डॉक्टरचा मृत्यू, मावळमधील चांदखेड येथील घटना

मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यातील चांदखेड इथे ओढ्यामध्ये भरधाव वेगात असणारी कार कोसळली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 21, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Doctor-Died-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यातील चांदखेड इथे ओढ्यामध्ये भरधाव वेगात असणारी कार कोसळली. ज्यात कारमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीचा जागेवर मृत्यू झाला आहे. ती व्यक्ती डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. डॉ. सत्यजित अर्जुनराव नवाडे (वय 42) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव असून रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथे डॉ. सत्यजित नवाडे यांचे हॉस्पिटल आहे. सर्व काम उरकल्यानंतर डॉक्टर चांडखेड येथून कारने बाहेर जात होते. मध्यरात्र असल्याने रस्त्यावर कोणतीही रहादारी नव्हती. त्यामुळे गाडी वेगात होती. मात्र, काही अंतर गेल्यावर चांदखेड गावाजवळ आल्यानंतर ओढ्यात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी शेजारी असलेल्या ओढ्यात कोसळली. गाडीचा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना याबाबत कळवले. ( Doctor Died After Speeding Car Fell Into Stream In Maval Taluka Pune )

त्यानंतर, पोलिस आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ संस्थेचे निलेश गराडे, अजय मुन्हे, अनिश गराडे, कृष्णा गायकवाड, प्रतीक थोरवे, शुभम काकडे, विनय सावंत, विकी दौंडकर, गणेश ढोरे, शिरगाव पोलिस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी अथक प्रयत्नानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये डॉ. सत्यजित नवाडे अडकले होते. त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या जाण्याने नवाडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अधिक वाचा –
– कुणाला घरकूल मिळणार? कुठे होणार नवीन रस्ता? टाकवे ग्रामपंचायतीची मंगळवारी ग्रामसभा
– श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर वर्धापन दिनानिमित्त वडगाव शहरात विविध कार्यक्रम
– तुमच्या नावावर किती सीम कार्ड? अवघ्या एका मिनिटात घ्या जाणून, ‘असं’ करा चेक…

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, लगेच वाचा

Next Post

‘छत्रपती शिवरायांचा एक गुण अंगिकारला तरीही जीवनात यशस्वी व्हाल’, वारंगवाडीमध्ये किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षिस वितरण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Fort-Build-Competition

'छत्रपती शिवरायांचा एक गुण अंगिकारला तरीही जीवनात यशस्वी व्हाल', वारंगवाडीमध्ये किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षिस वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BREAKING : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती

BREAKING : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती

June 15, 2025
Brilliant performance of school in Pimpalkhute village Maval at district level Honored by Ajit Pawar

कौतुकास्पद ! मावळमधील पिंपळखुटे गावातील शाळेची जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी ; अजित पवारांच्या हस्ते सन्मान

June 15, 2025
Maval Taluka NCP Meeting concluded at Vadgaon Mahayuti Rally on Saturday

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वडगावमध्ये सोमवारी महत्वपूर्ण बैठक ; आमदार शेळकेंसह सर्व पदाधिकारी राहणार उपस्थित

June 15, 2025
Ashadhi Wari 2025 Manik and Raja will pull Palki Rath of Saint Tukaram Maharaj

आषाढी वारी 2025 : माणिक आणि राजा ओढणार संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ ; आप्पाचीवाडी ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण

June 15, 2025
maharashtra-police

मोठी बातमी : लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; ‘या’ नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

June 15, 2025
welcoming-students

सोमवारपासून राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ; ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.