यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी 35/500 इथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून आज, मंगळवार दि 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत या लांबीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने द्रुतगती मार्गाच्या कि.मी 08/200 येथील शेडूंग फाटा येथून वळवून रा.म.मा. क्र. 48 जुना मुंबई पुणे महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट कि.मी. 42/100 इथून पुन्हा द्रुतगती मार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येईल. तसेच गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी 2 वाजता द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. ( two hour traffic block today on mumbai pune expressway for installation of grantee )
काय आहे सुचना?
“दिनांक 21/11/2023 रोजी दुपारी 12.00 ते 14.00 वा चे दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत km 35/500 या ठिकाणी Gantry बसविण्यात येणार आहे. Gantry बसविताना सदर कालावधीत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. पुणे वाहिनी बंद असताना मुंबईवरून पुणे दिशेला जाणारी वाहने ही शेडुंग फाटा किलोमीटर आठ दोनशे येथून वळून NH 4 जुना मुंबई पुणे महामार्ग – शिंग्रोबा घाट – मॅजिक पॉईंट KM 42 येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावर पुणे दिशेने मार्गस्थ होतील.”
अधिक वाचा –
– श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर वर्धापन दिनानिमित्त वडगाव शहरात विविध कार्यक्रम
– तुमच्या नावावर किती सीम कार्ड? अवघ्या एका मिनिटात घ्या जाणून, ‘असं’ करा चेक…
– ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा’, मावळ तालुक्यात भक्तीमय वातावरणात काकड आरती सोहळा सुरू