महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आयोजक सुधीर (अण्णा) पाटील यांच्या माध्यमांतून धाराशिव येथे आयोजित केल्या गेलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंतिम लढत शिवराज राक्षे विरुद्ध हर्षवर्धन सदगीर अशी झाली. यामध्ये शिवराजने हर्षवर्धन याचा 6-0 अशा गुणांच्या फरकाने पराभव करत दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. काही दिवसांपूर्वीच पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. शिवराजला मानाच्या स्व. मामासाहेब मोहोळ गदेने सन्मानित केले गेले.
धाराशिव येथे मागील पाच दिवसांपासून होत असलेल्या या स्पर्धेत माती गटातून हर्षवर्धन सदगीर याने गणेश जगताप याचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर शिवराज याने पृथ्वीराज मोहोळ याच्यावर मात केली होती. हे दोघेही यापूर्वी महाराष्ट्र केसरी ठरले असल्याने त्यांच्याकडे डबल महाराष्ट्र केसरी होण्याची संधी होती. अंतिम सामन्यात शिवराजने सुरुवातीला तीन गुण घेत सुरुवात केली. त्यानंतर त्याने हर्षवर्धन याला रिंगच्या बाहेर ढकलत आणखी दोन गुणांची कमाई केली. त्याचवेळी हर्षवर्धन याला दुखापत झाली. उर्वरित शिवराजने सावध खेळ करताना दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पैलवान शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी!
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, धाराशिव तालीम संघ व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या विद्यमाने तुळजाभवानी क्रिडा संकुल धाराशिव येथे झालेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नांदेडचा पै. शिवराज राक्षेने नाशिकच्या पै. हर्षवर्धन सदगिरचा पराभव… pic.twitter.com/wmJcjEDHci
— Dr. Tanaji Sawant – डॉ. तानाजी सावंत (@TanajiSawant4MH) November 20, 2023
विशेष म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला पुणे येथे झालेल्या स्पर्धेत देखील शिवराज हा विजेता झाला होता. तसेच दोन आठवड्यांपूर्वी फुलगाव येथील स्पर्धेत त्याला सिकंदर शेख याच्याकडून अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागलेले. महाराष्ट्र राज्यात कुस्तीच्या दोन संघटना निर्माण झाल्याने, या दोन्ही वेगवेगळ्या स्पर्धा खेळल्या जातात. ( Shivraj Rakshe Second Time Becomes Maharashtra Kesari 2023 In Dharashiv )
अधिक वाचा –
– तुमच्या नावावर किती सीम कार्ड? अवघ्या एका मिनिटात घ्या जाणून, ‘असं’ करा चेक…
– ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा’, मावळ तालुक्यात भक्तीमय वातावरणात काकड आरती सोहळा सुरू
– सोमाटणे गावात 50 लाख निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न