कै. बबनराव कलावडे प्रतिष्ठान आयोजित किल्ले बनवा स्पर्धा 2023 चे निकाल आणि बक्षिस वितरण समारंभ नुकताच पार पडला. यंदाचे प्रतिष्ठानकडून स्पर्धा आयोजित करण्याचे हे 4 थे वर्ष होते. प्रतिष्ठानचे संचालक सदस्य विक्रम प्रकाश कलावडे, कै.बबनराव कलावडे प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन वारिंगे, उपाध्यक्ष दत्तात्रय शिंदे आणि परिक्षक विवेक गुरव (शिवव्याख्याते) यांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सालाबादप्रमाणे याही वर्षी ही किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. ज्यात एकूण 43 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात एकूण चार क्रमांक ठेवण्यात आले होते. मुलांनी अतिशय छान असे गडकिल्ले बनविले आणि छान अशी गडकिल्ल्यांची माहिती व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामुळे बक्षीसे विभागून 4 पैकी 8 क्रमांक देण्यात आले. ( fort build competition 2023 warangwadi maval taluka )
स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे;
प्रथम क्रमांक – 7000 रू.
1) आयुष नितीन वारिंगे
2) देवांश दिलीप नखाते
द्वितीय क्रमांक – 5000 रू.
1) आदित्य मंगेश नखाते
2) राज भास्कर वारिंगे
तृतीय क्रमांक – 3000 रू.
1)शिवराज महेंन्द्र वारिंगे
2)हर्षवर्धन सोमनाथ वारिंगे
चतुर्थ क्रमांक – 2000 रू.
1) श्रद्धा विकास वारिंगे
2) मयुरेश देवदास तुमकर
“छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बालवयात मुलांमध्ये रुजवण्याची गरज आहे. किल्ला तयार करणे, दिपावली उत्सवात मोठा साजरा करण्यात येतो. बालवयात शिवाजी महाराज संघटन कौशल्य, जिजाऊ मातेने दिलेले संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले. म्हणून मुलांनो इतिहासाची पुस्तके वाचा आणि माझ्या शिवाजी महाराजाचा एक गुण अंगीकारला तर आपल्या जीवनात आपण नक्कीच यशस्वी होऊ.” – शिवव्याख्याते विवेक गुरव
विक्रम कलावडे यावेळी बोलताना म्हणाले की, “किल्ले बनवा स्पर्धेमुळे मुले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि इतिहास समजतो. मुलांमधील कला समजते आणि मुलांना व्यासपीठ निर्माण होते. ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत रमेश खोंडगे, रामनाथ धुमाळ, राम वारिंगे, सोमनाथ गव्हाणे, बाळसो तुमकर, तुकाराम धुमाळ, सिताराम धुमाळ, दिलीप नखाते, विनोद थोरवे, सुनिल नखाते, रोहित वारिंगे, अजय नखाते, ऋषिकेश वारिंगे, नितीन वारिंगे, अनिल वारिंगे(पाटील), दत्ता कारके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय वारिॅगे आणि नितीन नखाते यांनी केले.
अधिक वाचा –
– शिवराज राक्षे पुन्हा ठरला महाराष्ट्र केसरी! धाराशिव मुक्कामी जिंकली मानाची गदा
– कुणाला घरकूल मिळणार? कुठे होणार नवीन रस्ता? टाकवे ग्रामपंचायतीची मंगळवारी ग्रामसभा
– श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर वर्धापन दिनानिमित्त वडगाव शहरात विविध कार्यक्रम