व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनला जाण्याची गरज नाही; आता घरबसल्या मोबाईलवर करा ऑनलाईन तक्रार

तक्रार नोंदवण्याचा अनेक पद्धती आहेत. तक्रारधारक फोनवरून तक्रार दाखल करू शकतात किंवा एखाद्याला तक्रार करायची असल्यास तो 112 क्रमांक डायल करून पोलिसांना कॉल करू शकतो. Procedures for filing complaint at police station Online complaint procedure and website.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 21, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Online-Police-complaint-website

Photo Courtesy : Team Dainik Maval


आपल्याकडे असे म्हटले जाते की, शहाण्यांनी पोलिस स्टेशनची पायरी चढू नये. पण जर गुन्हा आपण घडताना पाहिला असेल किंवा एखाद्या गुन्ह्याची तक्रार करण्याची वेळ आपल्यावरच आली, तर मग काय? आपला मोबाईल किंवा किमती वस्तू हरवली असेल तर मग काय? अशा वेळी आपण पोलिस ठाण्यात जातोच जातो. परंतू आता, पोलिस स्टेशनमध्ये न जाताही तुम्ही तुमची तक्रार करु शकता. यालाच ऑनलाईन तक्रार करणे म्हणतात. याबद्दल आपण या लेखातून सविस्तर जाणून घेणार आहोत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गुन्ह्यांचे वर्गीकरण साधारण दोन प्रकारात केले जाते;
1. अदखलपात्र गुन्हा आणि 2. दखलपात्र गुन्हा
अदखलपात्र गुन्हा- म्हणजेच फारसे गंभीर नसलेले गुन्हे, हे खाजगी स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ फसवणूक, त्रास देणे, सार्वजनिक उपद्रव इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात कोणताही पोलिस अधिकारी न्यायदंडाधिकारी यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करू शकत नाही.
दखलपात्र गुन्हा – म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उदाहरणार्थ चोरी, बलात्कार, हत्या, खंडणी, इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात एफआयआर दाखल करणं गरजेचं असतं.

तक्रार नोंदवण्याचा अनेक पद्धती आहेत. यात तक्रार धारक फोन करुन तक्रार दाखल करू शकतात. म्हणजेच एखाद्याला एखाद्या प्रकरणाची तक्रार करायची असल्यास तो व्यक्ती 112 क्रमांक डायल करून पोलिसांना कॉल करू शकतो. किंवा, थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवणे आणि अखेरीस ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवणे. ( Procedures for filing complaint at police station Online complaint procedure and website )

पोलिस ठाण्यात न जाता ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवणे –

ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवण्याचे अनेक फायदे आहेत. सध्या, ऑनलाइन तक्रार नोंदवणे ही सर्वात सुरक्षित आणि सोयीची पद्धत आहे. तक्रार नोंदविण्यासाठी किंवा एफआयआर दाखल करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल वापरणे सोपे आहे. वेबसाइटवरील पर्याय देखील समजणे सोपे आहे. ई-कॉपी ईमेलमध्ये सुरक्षित राहते आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सहज आपणास उपलब्ध होते. ऑनलाइन पोर्टलकडे तक्रारीची सद्यस्थिती तपासण्यासाठी एक विभाग आहे. एफआयआरची एक प्रत तक्रारदाराने दिलेल्या ईमेल पत्त्यावर पाठवली जाते. म्हणून, तक्रारदाराने तक्रार नोंदवताना एक कार्यरत ईमेल पत्ता आणि / किंवा त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप संपर्क निश्चित देणे आवश्यक आहे. गुन्ह्याची ऑनलाईन तक्रार नोंदवणे अधिक सोयीचे आहे व ते स्वस्त आहे.

आपल्याकडे अशी उदाहरणे समोर आहेत, जिथे पोलिस अधिकारी तक्रार घेण्यास नकार देतात. अशा प्रथा टाळण्यासाठी, ऑनलाइन तक्रार नोंदवणे चांगले आहे, कारण ते नेहमीच रेकॉर्डवर असते. ते पोलिस हटवू शकत नाहीत. जे पोलीस अधिकारी आपली कर्तव्य बजावत नाहीत त्यांना काम करण्यास ऑनलाइन तक्रार भाग पाडू शकते. आणि तक्रारदारास यावर त्वरित उपाय मिळतो.

ऑनलाइन तक्रार कशी केली जाते?

ऑनलाइन तक्रार करण्यासाठी राज्य पोलीस वेबसाईटवर जावे लागते आणि वेबसाईट वरील दाखवलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन तक्रार वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा – https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/Login.aspx
हरवलेल्या मोबाईलची तक्रार करण्यासाठी इथे क्लिक करा – https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/MobileMissingForm.aspx

एफआयआर नोंदवताना, गुन्हा घडलेली नेमकी जागा, नेमका हा गुन्हा कधी घडला ती नेमकी वेळ, माहिती असल्यास गुन्हेगाराचे नाव, नाव माहिती नसल्यास त्याचे अचूक वर्णन, गुन्हा घडताना आजूबाजूला कोण व किती माणसे होती, त्याचा तपशीलवार व अचूक वर्णन, हा गुन्हा कोणत्या स्वरूपाचा होता इत्यादी. हे तपशीलवार लिहिणे आवश्यक आहे. प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र पोलीस वेबसाईट आहे. सध्या गुन्हा नोंदवण्याची ऑनलाइन पद्धतीत ही सर्वात सुरक्षित आणि सोयीची आहे.
(माहिती स्त्रोत- https://mbvv.mahapolice.gov.in/Detection_blog?id=13)

अधिक वाचा –
– शिवराज राक्षे पुन्हा ठरला महाराष्ट्र केसरी! धाराशिव मुक्कामी जिंकली मानाची गदा
– कुणाला घरकूल मिळणार? कुठे होणार नवीन रस्ता? टाकवे ग्रामपंचायतीची मंगळवारी ग्रामसभा
– श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर वर्धापन दिनानिमित्त वडगाव शहरात विविध कार्यक्रम


dainik maval jahirat

Previous Post

‘छत्रपती शिवरायांचा एक गुण अंगिकारला तरीही जीवनात यशस्वी व्हाल’, वारंगवाडीमध्ये किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षिस वितरण

Next Post

‘जनरल मोटर्स’च्या कामगारांच्या उपोषणाला जरांगे पाटलांची भेट; कामगारांकडून रक्तदान आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
manoj-jarange-visit-maval

‘जनरल मोटर्स’च्या कामगारांच्या उपोषणाला जरांगे पाटलांची भेट; कामगारांकडून रक्तदान आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.