व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘जनरल मोटर्स’च्या कामगारांच्या उपोषणाला जरांगे पाटलांची भेट; कामगारांकडून रक्तदान आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध

जनरल मोटर्स कामगार संघटनेचा साखळी उपोषणाचा सोमवारी, दि. 20 नोव्हेंबर 50 वा दिवस होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 21, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
manoj-jarange-visit-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


जनरल मोटर्स कामगार संघटनेचा साखळी उपोषणाचा सोमवारी, दि. 20 नोव्हेंबर 50 वा दिवस होता. सोमवारी साखळी उपोषण आंदोलनास विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यामध्ये मराठा योद्धा व मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे-पाटील यांनी भेट दिली आणि कामगारांची परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप भेगडे, सचिव राजेंद्र पाटील तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व समाजसेवक मारुती भापकर व मराठा क्रांती मोर्चाचे मावळ तालुका समन्वयक बंटी मुर्‍हे साहेब उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मागील 50 दिवसापासून जनरल मोटर्सचे कामगार त्यांच्या न्याय व हक्कासाठी साखळी उपोषण करत असून याकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या निषेधार्थ जनरल मोटर्स कामगारांच्या साखळी उपोषण स्थळी कामगारांच्या वतीने रक्तदान आंदोलन करून महाराष्ट्र शासनाचा तसेच कामगार मंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी जनरल मोटर्स कामगार संघटनेचे सेक्रेटरी राजेंद्र पाटील म्हणाले की ” शासन आपलं तर रक्त शोषण करत आहे, त्यापेक्षा आपणच बेमुदत साखळी उपोषणाच्या पन्नासाव्या दिवसापासून महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर जनरल मोटर्स 1000 कामगारांचा प्रश्न सोडवण्याकरता रक्तदान आंदोलन करत आहोत”.

रक्तदान आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सरकारला कामगार प्रश्नावर जाग आणण्या करता कामगारांच्या रक्ताची पिशवी पोस्टाद्वारे पाठवण्यात येत आहे. निदान सरकारने कामगारांच्या रक्तदानाच दखल घेऊन लवकरात लवकर प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. आंदोलन स्थळी कामगारांच्या पत्नींनी माननीय मंत्री महोदयांना प्रातिनिधीक स्वरूपात रक्ताने पत्र लिहून कामगार प्रश्न न सोडवल्या बद्दल तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाच्या 50 व्या दिवशी 101 कामगारांनी रक्तदान केले व माननीय कामगार मंत्र्यांच्या प्रतिमेस प्रतिनिधी स्वरूपात रक्ताने अभिषेक घातला. ( maratha reservation manoj jarange visit hunger strike of general motors company workers )

अधिक वाचा –
– धक्कादायक! कार ओढ्यात कोसळून डॉक्टरचा मृत्यू, मावळमधील चांदखेड येथील घटना
– Breaking! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, लगेच वाचा
– शिवराज राक्षे पुन्हा ठरला महाराष्ट्र केसरी! धाराशिव मुक्कामी जिंकली मानाची गदा


Previous Post

तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनला जाण्याची गरज नाही; आता घरबसल्या मोबाईलवर करा ऑनलाईन तक्रार

Next Post

मंडल अधिकारी आणि तलाठ्यांना मिळणार हक्काची कार्यालये; तालुक्यात होणार 7 मंडलाधिकारी आणि 43 तलाठी कार्यालये

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke

मंडल अधिकारी आणि तलाठ्यांना मिळणार हक्काची कार्यालये; तालुक्यात होणार 7 मंडलाधिकारी आणि 43 तलाठी कार्यालये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balasaheb Dalvi elected as Chairman of Kothurne Various Development Cooperative Society in Pawan maval

पवनमावळातील कोथुर्णे विविध विकास सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब दळवी यांची निवड

May 6, 2026
Police remove accused in BJP worker Ramesh Reddy murder case from scene

भाजपा कार्यकर्ते रमेश रेड्डी हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी घटनास्थळावरून काढली धिंड

May 6, 2026
leopard Image

देहूरोड आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

May 6, 2026
Crime

संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल

May 6, 2026
Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.