लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत मॅगी पॉईंट येथे शर्ती पेक्षा जास्त वेळ आस्थापना चालू ठेवणाऱ्या 5 टपरी धारकांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी वारंवार सूचना देऊन व कारवाई करुन ही मॅगी पॉईंट येथील टपरी धारक आपली टपरी रात्रभर चालू ठेवून तेथे मुंबई पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांना मॅगी व इतर खाद्य पदार्थांची विक्री करत असत. त्यामुळे सदर ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यावर सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी स्वतः लक्ष घालून शर्तीपेक्षा जास्त वेळ टपरी चालू ठेवून खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या टपरी धारकांवर कारवाई करुन त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच यापुढेही लोणावळा विभागात रात्री उशीरापर्यंत आस्थापणांतून खाद्य पदार्थांची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लोणावळा पोलिसांकडून देण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. सहा. पोलीस अधिक्षक सत्यासाई कार्तिक, लोणावळा उपविभाग यांचे मार्गदर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक राहुल लाड लोणावळा शहर पोलीस स्टेशन पोशि/ विकास कदम, होमगार्ड तिखे, होमगार्ड ठाकर यांनी केली आहे. ( Lonavala Police action against 5 businessmen at Magi Point )
अधिक वाचा –
– ‘जनरल मोटर्स’च्या कामगारांच्या उपोषणाला जरांगे पाटलांची भेट; कामगारांकडून रक्तदान आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध
– तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनला जाण्याची गरज नाही; आता घरबसल्या मोबाईलवर करा ऑनलाईन तक्रार
– ‘छत्रपती शिवरायांचा एक गुण अंगिकारला तरीही जीवनात यशस्वी व्हाल’, वारंगवाडीमध्ये किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षिस वितरण