व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्यातील महिला वर्गासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय!

एसटी महामंडळाला 20 नोव्हेंबरला एका दिवशी 36.73 कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 23, 2023
in महाराष्ट्र
CM-Eknath-Shinde-Twitter-Video

Photo Courtesy : Twitter / Eknath Shinde


राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्यातील बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच 10 टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ संचालकांच्या या बैठकीत नवीन वर्षात 3 हजार 495 एसटी बसेस सेवेत दाखल करण्यासाठी मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी, दि. 22 नोव्हेंबर परदेशी शिक्षण अग्रीम योजना, धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान याबाबत आढावा घेतला.

Novel NIBR Ads

आणखीन 2200 बसेस घेण्यासाठी परवानगी –

एसटी महामंडळाला 20 नोव्हेंबरला एका दिवशी 36.73 कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले. राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी तयार 2200 साध्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामुळे 2200 तयार परिवर्तन साध्या बसेस मार्च 2024 अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या २१ वेगवेगळ्या विभागांसाठी 12995 साध्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी देखील याबैठकीत मान्यता देण्यात आली. एसटीतर्फे येत्या दोन वर्षांत 5150 ई-बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरावर त्यांची सेवा देण्यात येणार आहे. या बससेवकरीता सामान्यांना परवडेल असेच तिकीट दर ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच, बसस्थानकातील स्वच्छतेला प्राधान्य देत त्यांचा चेहरामोहरा बदलावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

बस स्थानकांच्या ठिकाणी आरोग्य सुविधा देण्याच्या सुचना –

राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकांवर आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच आरोग्य तपासणी योजनेत महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणीचा समावेश करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. बसस्थानकांवरील होर्डींग्जची दुरुस्ती करतानाच त्यांची सजावट करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ( stalls for women self help groups at bus stand Decision by CM Eknath Shinde )

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– मंडल अधिकारी आणि तलाठ्यांना मिळणार हक्काची कार्यालये; तालुक्यात होणार 7 मंडलाधिकारी आणि 43 तलाठी कार्यालये
– ‘जनरल मोटर्स’च्या कामगारांच्या उपोषणाला जरांगे पाटलांची भेट; कामगारांकडून रक्तदान आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध
– तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनला जाण्याची गरज नाही; आता घरबसल्या मोबाईलवर करा ऑनलाईन तक्रार


dainik maval jahirat

Previous Post

IPS सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा पोलिसांची 5 जणांवर कारवाई, जाणून घ्या कारण

Next Post

स्तुत्य उपक्रम! सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
sweaters-Distribution

स्तुत्य उपक्रम! सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.