वडगाव मावळ : येथील गणेश प्रभाकर जाधव यांची कन्या कु. वेदा हिचा पाचवा वाढदिवस आंदर मावळ पठारावर असणाऱ्या सटवाईवाडी या आदिवासी पाड्यावरील लहान मुलांसोबत साजरा करण्यात आला. वेदाचा पहिला व दुसरा वाढदिवस आदिवासी पाड्यांवरच साजरा केला गेला होता. दोन वर्षे कोरोना महामारीमुळे तो योग आला नाही, परंतू यावर्षी हा योग आला. त्यामुळे तिचा पाचवा वाढदिवस वडेश्वरच्या सटवाई वाडी या आदिवासी पाड्यावरील लहान मुलांना ऊबदार स्वेटर आणि खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला, अशी माहिती वेदाच्या कुटुंबीयांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आम्ही मुलांचे वाढदिवस असेच आदिवासी पाड्यांवर, धनगर वस्त्यांवर, ठाकर वस्त्यांवर, साजरे करतो. आमचं नशीब हे खूप चांगले आहे की, मुलीचा वाढदिवस नेहमी दीपावलीनंतर थंडीच्या दिवसात येतो. आपल्या येथील ग्रामीण भागातील हे दिवस खूप छान आणि थंडीच्या असतात. यावर्षी मुलीचा पाचवा वाढदिवस आंदर मावळातील वडेश्वरची सटवाईवाडी गावात करण्याचे ठरवले. पन्नास ते साठ उंबरा असलेली वस्ती. गावाचा पूर्ण आढावा घेतल्यावर वस्तीमध्ये बालवाडी ते चौथीपर्यंत साठ लहान मुलं-मुली असल्याचे समजले. त्यामुळे ह्या थंडीच्या दिवसात प्रत्येक लहानग्यांना चांगल्या प्रकारचे ऊबदार जर्किंग आणि खाऊ वाटप केला, अशी माहिती जाधव कुटुंबीयांनी दिली. ( Distribution of sweaters to tribal children on birthday vadgaon )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादीचे नेते बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन, पाहा ठिकाण आणि वेळ
– मंडल अधिकारी आणि तलाठ्यांना मिळणार हक्काची कार्यालये; तालुक्यात होणार 7 मंडलाधिकारी आणि 43 तलाठी कार्यालये
– ‘जनरल मोटर्स’च्या कामगारांच्या उपोषणाला जरांगे पाटलांची भेट; कामगारांकडून रक्तदान आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध