महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथील विधानभवनात सुरु आहे. या नागपूर हिवाळी अधिवेशनात मावळ तालुक्यातील विविध विकासकामांसाठी सुमारे 428 कोटी 91 लक्ष निधीच्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘आपल्या मावळ तालुक्यातील औद्योगिक,पर्यटन व ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दृष्टीने आवश्यक असणारे महत्त्वाचे रस्ते, दुर्गम भागाला जोडणारे रस्ते, नदीवरील पुल आणि सक्षम आरोग्य व्यवस्था यासाठी निधी उपलब्ध झाल्याने मावळच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच गती मिळणार आहे.’ अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली.
त्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मावळच्या जनतेच्या वतीने आभार मानले. तसेच मावळ तालुक्यातील आंदर मावळातील मुख्य रस्ता कान्हे फाटा- टाकवे-वडेश्वर-कुसूर- खांडी-सावळा रस्ता सुधारणा करण्यासाठी 336 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. ( Maharashtra State Winter Session Nagpur 2023 428 crore fund approved for Maval taluka )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडेतील जय वकील स्कूल इथे दिव्यांग दिन साजरा । Talegaon Dabhade
– अवघा रंग एक झाला…! चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन
– तळेगाव रोटरी क्लबच्या वतीने 488 विद्यार्थ्यांचे धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण । Talegaon Dabhade