खोपोली पोलिसांनी दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी 107 कोटी 30 लाख 37 हजार 377 रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले होते. त्याच प्रकरणी अधिक तपास सुरू असताना दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी अटक आरोपी अँथोनी पाऊलोस करीकुट्टीकरण याच्याकडून खालापूर तालुक्यातील होनाड गावातल्या गोडाऊनमध्ये लपून ठेवलेल्या सात बॅरल मधील 174.5 किलो वजनाचा 218 कोटी 12 लाख 50 हजार रुपये किमतीचे विशिष्ट अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळताच, तिथे ताबडतोब धाड टाकून माल जप्त केला. तसेच करीकुट्टीकरण याने काही अमली पदार्थ परदेशात पाठवले असल्याचीही माहिती दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याबद्दल पत्रकार परिषद घेऊन कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी प्रकरणाची माहिती माध्यमांना दिली. यावेळी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्यासह खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने, अभिजीत व्हरांबळे, पोलीस हवालदार सागर शेवते, प्रसाद पाटील, प्रशांत पाटील, प्रदीप कुंभार, संतोष रुपनवर, लिंबाजी शेंडगे, सतीश बांगर, प्रवीण भालेराव, प्रदीप खरात इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून अजूनही काही धागेदोरे मिळण्याची शक्यता प्रवीण पवार यांनी व्यक्त केली आहे. ( Khopoli police seized narcotics worth more than 218 crores in Khalapur taluka )
अधिक वाचा –
– हिवाळी अधिवेशनातून मावळ तालुक्याला मिळणार मोठी गुड न्यूज! मावळवासियांची उत्कंठा शिगेला, कोणती घोषणा होणार?
– ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा । Actor Ravindra Berde Passed Away
– तिकोणा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा सुतार बिनविरोध । Gram Panchayat Election