माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दिनांक 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. त्यांचा वाढदिवस राज्यात ठिकठिकाणी कार्यरर्ते आणि समर्थकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शऱद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार यांच्या 83 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने लोणावळा नगरपरिषद आवारात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 102 बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळा शहर राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर, कार्याध्यक्ष रवी पोटफोडे, युवक अध्यक्ष विनोद होगले, महिला अध्यक्षा उमा मेहता, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, रमेशचंद्र नय्यर, नारायण पाळेकर, मंजू वाघ, मच्छिंद्र खराडे, निखिल कवीश्वर आदींच्या उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी कार्यकर्त्यांच्यावतीने केक कापत शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले. ( blood donation camp on occasion of Sharad Pawar birthday by NCP Youth Congress in Lonavla Maval )
तसेच, माजी नगरसेविका अंजली कडू, दीपाली गवळी, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, संचालक सुभाष जाधव, दत्तात्रेय पडवळ, अतुल राऊत, कुमार धायगुडे, राजू बोराटी, रमेश दळवी, सनी दळवी, राजेश मेहता, सोमनाथ गायकवाड, सलीम मणियार, फिरोज शेख, आदिल शेख, सईद खान, हेमंत मुळे, अजिंक्य कुटे, आदी मान्यवरांनी शिबिरात हजेरी लावत शुभेच्छा दिल्या.
अधिक वाचा –
– ‘विद्यार्थ्यांनी भविष्यातील विविध क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांवर भर द्यावा’ – माजी मंत्री बाळा भेगडे
– धक्कादायक! खोपोली पोलिसांकडून 218 कोटीपेक्षा अधिक किमतीचे 174.5 किलो अं’मली पदार्थ जप्त
– काले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक पदी कविता कालेकर आणि नामदेव कालेकर बिनविरोध