शिरगाव-परंदवडी पोलिसांनी शिरगाव (ता. मावळ) येथील एका शेतात छापा मारून अवैध रित्या सुरु असलेली गावठी दारू निर्मित करणारी दारूभट्टी उध्वस्त केली. सोमवार, दि. 18 डिसेंबर रोजी दुुपारच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अनिल जुंदरे यांनी फिर्यादी दिली असून पोलिसांनी संदीप रमेश सूर्यवंशी (वय 46 रा खळवाडी, मावळ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शिरगाव येथील एका शेताच्या बाजूला बेकायदेशीररित्या देशी दारू तयार करत होता. त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 500 रुपयांचे दारू तयार करण्याचे रसायन जप्त केले. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी तेथून पसार झाला. शिरगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. ( police raid on illegal liquor den in shirgaon village maval )
अधिक वाचा –
– ‘अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ करा’, खासदार श्रीरंग बारणेंचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पत्र
– मोठी बातमी! मावळात ‘दादा’ गटाच्या अनेक नेत्यांचा ‘साहेब’ गटात प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्याने नियुक्त्या जाहीर
– राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश