व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना शिक्षण संकुलामध्ये यु.पी.एल. कंपनीच्या 50 लाख निधीतून बांधण्यात आलेल्या अद्ययावत स्वच्छतागृहाचे लोकार्पण

यु.पी.एल लिमीटेड कंपनी व पवना प्राॅपर्टी असोसिएशनच्या निधीतून पवना विद्या मंदिर शाळेसाठी येथे सुमारे 50 लाख रुपये खर्च करून अद्ययावत स्वच्छतागृह बांधून दिले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 22, 2023
in लोकल, ग्रामीण
pavana-education-complex

Photo Courtesy : Team Dainik Maval


यु.पी.एल लिमीटेड कंपनी व पवना प्राॅपर्टी असोसिएशनच्या निधीतून पवना विद्या मंदिर शाळेसाठी येथे सुमारे 50 लाख रुपये खर्च करून अद्ययावत स्वच्छतागृह बांधून दिले. या स्वच्छतागृहाचे लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. पवना शिक्षण संकुल हे पवनमावळातील बालवाडी ते ज्युनिअर कॉलेज शिक्षण देणारी अग्रगण्य शाळा असून या पवना शिक्षण संकुलात 1200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परिसरातील नामांकित पवना प्रॉपर्टी असोसिएशन व युपीएल कंपनीनच्या सामाजिक उत्तरदायित्वातून अद्ययावत स्वच्छतागृह बांधून देण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

या स्वच्छतागृहाचे लोकार्पण उद्योजक पद्मभूषण रज्जू श्रॉफ आणि सॅन्ड्रा श्रॉफ यांच्या हस्ते उद्घाटन करुन संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे हे होते. यावेळी बोलताना संतोष खांडगे म्हणाले की, सध्या समाजामध्ये स्वच्छतेबाबत जागृती होत असते त्याचाच आधार घेऊन ग्रामीण भागातील शाळांसाठी पवना प्रॉपर्टी असोसिएशन व युपीएल कंपनीनच्या सामाजिक उत्तरदायित्वातून सुसज्ज असे स्वच्छतागृह उपलब्ध झाली आहे. या दोन्ही सामजिक संस्थेचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान हे वाखाणण्याजोगे आहे. ( new toilet at pavana education complex through UPL company )

यावेळी कार्यक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ राहटणी चे संस्थापक वसंत कोकणे, अध्यक्ष अमोल दापूरकर, संस्थेचे जेष्ठ संचालक दामोदर शिंदे,सोनबा गोपाळे, महेशभाई शहा,शंकरराव नारखेडे,पवना शिक्षण संकुलाचे पालक सदस्य सुनिल भोंगाडे, पवना प्रॉपर्टी असोसिएशन मॅनेजर रोहितलाल श्रीवास्तव, मावळ तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शोभाताई वहिले,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका अंजली जांभूळकर, कालेच्या उपसरपंच छाया कालेकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष काशिनाथ निंबळे, मुख्याध्यापक पांडूरंग ठाकर,शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर, विश्वनाथ जाधव, करूंजचे सरपंच सदाशिव शेंडगे, माजी सरपंच शंकर लोखंडे;

यांसह अभय गांधी कालेचे केंद्रप्रमुख पांडुरंग डेंगळे, वारुचे केंद्रप्रमुख राजेश राऊत, मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक नितीन वाघमारे, संजय ठुले, गोरख जांभूळकर, धोंडीबा घारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रॉफ म्हणाले की, पुढील काळात पवना प्रॉपर्टी असोसिएशन व युपीएल कंपनीनच्या माध्यमातून पवना परिसरातील डिजीटल शाळा तसेच पर्यावरण पूरक शाळा करण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत केली जाईल. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी केले. सुत्रसंचालन रोशनी मराडे, वैशाली वराडे व भारत काळे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांनी मानले.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! तब्बल 40 ड्रोन्सचा वापर करुन ‘एनआयए’ने रोखले मुंबईवरील दहशतवादी हल्ले
– महत्वाची बातमी! ‘तळेगाव-चाकण-शिक्रापूर’ दरम्यान उन्नत मार्गाला लवकरच केंद्र सरकारची मंजुरी मिळणार
– नवं संकट! कोरोना जेएन-वन व्हेरिएंट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा, नागरिकांना केले ‘हे’ आवाहन


Previous Post

‘देहूतील सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत झाल्या पाहिजेत’, प्रशासनाने कारवाई न केल्यास मनसेकडून ‘खळ्ळ-खट्याक’चा इशारा

Next Post

‘वडगाव बाजारपेठेतील मुख्य रस्ता आहे तोच कायम ठेवा’, बाजारपेठेतील घरमालकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-maval

'वडगाव बाजारपेठेतील मुख्य रस्ता आहे तोच कायम ठेवा', बाजारपेठेतील घरमालकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.