व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाची बातमी! ‘तळेगाव-चाकण-शिक्रापूर’ दरम्यान उन्नत मार्गाला लवकरच केंद्र सरकारची मंजुरी मिळणार

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. अशीच परिस्थिती देहूरोड सेंट्रल चौक ते चांदणी चौक दरम्यान देखील असते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 22, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
shrirang-barne-nitin-gadkari

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. अशीच परिस्थिती देहूरोड सेंट्रल चौक ते चांदणी चौक दरम्यान देखील असते. या मार्गांवरील कोंडी कमी करण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला यश येत असून तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यान उन्नत मार्गाला केंद्राकडून लवकरच मंजुरी मिळणार आहे. याबाबत स्वतः केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत माहिती दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यात गुरुवारी (दि. 21 डिसेंबर ) मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दोन महत्वाच्या रस्त्यांबाबत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पासून तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पासून देहूरोड सेंट्रल चौक-किवळे-वाकड-चांदणी चौक मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 ला जोडणाऱ्या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. मात्र अद्याप या मार्गांचे काम सुरु झालेले नाही. ( elevated route between Talegaon Chakan Shikrapur will soon shrirang barne nitin gadkari )

त्यामुळे तळेगाव, चाकण, शिक्रापूर, पिंपरी-चिंचवड एमआयडीसी येथे जाणारी अवजड वाहने, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 कडे (मुंबई-बेंगलोर महामार्ग) जाणारी वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडतात. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या दोन्ही मार्गावरील कामाला मंजुरी कधी मिळेल आणि काम कधीपर्यंत सुरु होईल, असे बारणे यांनी आपल्या प्रश्नात म्हटले.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रश्नाला केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले. नितीन गडकरी म्हणाले, पुणे-मुंबई मार्गासह तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मार्गांवर मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतूक होते. या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दरम्यान उड्डाणपुल बांधला जाणार आहे. त्याचे डिझाईन बनवण्यात आले असून त्याचा डीपीआर देखील तयार झाला आहे. तो डीपीआर दिल्ली येथे मंजुरीसाठी आला आहे. त्याला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे.

  • पुणे-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर या मार्गावर नवीन द्रुतगती मार्ग बनवला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवलेल्या कार्पोरेशनला बीओटी तत्वावर या रस्त्याचे काम देण्याबाबत विचार सुरु आहे. याच दरम्यान तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यानचा देखील उन्नत मार्ग बनवला जाणार आहे. त्याला लवकरच मंजुरी दिली जाईल.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गासह मुंबई-बेंगलोर महामार्गावर देहूरोड सेंट्रल चौक-रावेत-पुनावळे-चांदणी चौक या दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्याच अनुषंगाने बारणे यांनी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. खासदार बारणे यांचा पाठपुरावा यशस्वी ठरत असून लवकरच उन्नत मार्गाला मंजुरी मिळणार आहे. मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवातील होईल.

अधिक वाचा –
– राष्ट्रवादीकडून गावनिहाय संवाद दौऱ्याची उत्साहात सुरुवात; दुसऱ्या टप्प्यात गावोगावी चर्चा आणि बैठका
– मोठी बातमी! मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी ते जून २०२४ दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा


dainik maval jahirat

Previous Post

नवं संकट! कोरोना जेएन-वन व्हेरिएंट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा, नागरिकांना केले ‘हे’ आवाहन

Next Post

मोठी बातमी! तब्बल 40 ड्रोन्सचा वापर करुन ‘एनआयए’ने रोखले मुंबईवरील दहशतवादी हल्ले

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
nia-terror-Mumbai

मोठी बातमी! तब्बल 40 ड्रोन्सचा वापर करुन 'एनआयए'ने रोखले मुंबईवरील दहशतवादी हल्ले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.