व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, November 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हक्काचे पाणी वाचविण्यासाठी आंदर मावळात धरणग्रस्त कृती समिती आक्रमक; गावोगावी घोंगडी बैठका घेणार

ठोकळवाडी धरणातील ३ टीएमसी पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास तीव्र विरोध

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 18, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Thokalwadi Dam-affected residents action committee in Andar Maval aggressive stance to secure water

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ठोकळवाडी धरणातील ३ टीएमसी पाणी पिंपरी-चिंचवड शहराला देण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी आंदर मावळातील धरणग्रस्त कृती समितीने आता संघटित लढ्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्य यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पाणी प्रश्नासह धरणग्रस्तांच्या हक्कांसाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करून विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

ठोकळवाडी धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड शहराला देण्यास विरोध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. विशेषतः १८८८ पासून ते २०२६ पर्यंत टाटा कंपनीसोबत झालेले करार, त्यातील अटी व शर्ती तसेच पाण्याच्या वापरासंदर्भातील ऐतिहासिक नोंदींची माहिती संकलित करण्यात येणार आहे. या कागदपत्रांच्या आधारे धरणग्रस्तांच्या हक्काची बाजू सक्षमपणे शासन आणि प्रशासनासमोर मांडली जाणार आहे.

या प्रश्नासंदर्भात वडगाव मावळ येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असून, शासन आणि प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणीही करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीवाटपाच्या प्रश्नावर अधिकृत भूमिका स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, या लढ्याला गावपातळीवर व्यापक जनसमर्थन मिळावे, यासाठी अंदर मावळातील प्रत्येक गावात तसेच वाड्या-वस्त्यांवर घोंगडी बैठका आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावातील धरणग्रस्त शेतकऱ्याने कृती समितीचा सदस्य बनावे, यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली जाणार आहे. आपल्या हक्काच्या पाण्यासाठीची लढाई ही आपल्यालाच एकजुटीने लढावी लागेल, असा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.

धरणग्रस्त कृती समिती आगामी काळात धरणग्रस्तांच्या सर्व प्रलंबित मागण्यांसाठी आवाज उठवणार असली, तरी सध्या समितीची प्रथम आणि प्रमुख मागणी ठोकळवाडी धरणातील हक्काचे पाणी पिंपरी-चिंचवड शहराला देऊ नये, हीच राहणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

एकजुटीतूनच हक्काच्या पाण्याचे संरक्षण!
आंदर मावळातील सर्व नागरिक, धरणग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या लढ्यात एकत्र सहभागी व्हावे, असे आवाहन धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. आपल्या पुढील पिढ्यांच्या पाण्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे येणे गरजेचे आहे. संघटित शक्तीच्या बळावरच हा लढा यशस्वी होऊ शकतो, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळातील ऊसतोड मजुरांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट ; दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत दिवाळी साजरी
– पाचाणे येथे शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप ; शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न
– श्री तीर्थक्षेत्र आई एकविरा देवी येथील मंदिर जतन, संवर्धन व परिसरातील विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश


dainik maval jahirat

Previous Post

थोरण–खंडशी ग्रामस्थांचा टाटा कंपनीविरोधात एल्गार! जंगलतोड रोखण्यासाठी चिपको आंदोलन करण्याची ग्रामस्थांची तयारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Thokalwadi Dam-affected residents action committee in Andar Maval aggressive stance to secure water

हक्काचे पाणी वाचविण्यासाठी आंदर मावळात धरणग्रस्त कृती समिती आक्रमक; गावोगावी घोंगडी बैठका घेणार

November 18, 2026
Villagers of Thoran Khandshi maval raise voices against Tata company Project

थोरण–खंडशी ग्रामस्थांचा टाटा कंपनीविरोधात एल्गार! जंगलतोड रोखण्यासाठी चिपको आंदोलन करण्याची ग्रामस्थांची तयारी

November 18, 2026
bribe

लोणावळ्यात खळबळ! 20 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक रंगेहात जाळ्यात, ‘एसीबी’ची कारवाई

November 18, 2026
Theft-News

Lonavala Crime : लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री पाच दुकाने फोडली, १६ हजारांची रोकड लंपास

November 17, 2026
Pappu Kalekar from Maval selected for global wrestling referee examination to be held in Egypt

मावळातील पप्पू कालेकर यांची इजिप्त येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती पंच परिक्षेसाठी निवड; तर प्रविण राजिवडे राष्ट्रीय पंच परिक्षा अव्वल श्रेणीत उत्तीर्ण

November 17, 2026
water scarcity in Dhalewadi-Malewadi village stage lock the office protest at Mahagaon Gram Panchayat Maval

धालेवाडी-मालेवाडीत तीव्र पाणीटंचाई, पाण्यासाठी दोन तासांची पायपीट; महागाव ग्रामपंचायतीला ग्रामस्थांचे ‘टाळे ठोको’ आंदोलन

November 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.