व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, November 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

थोरण–खंडशी ग्रामस्थांचा टाटा कंपनीविरोधात एल्गार! जंगलतोड रोखण्यासाठी चिपको आंदोलन करण्याची ग्रामस्थांची तयारी

“एकही झाड तोडू देणार नाही, आम्हाला रोजगार नको, आमचा सह्याद्री हवा!”

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 18, 2026
in लोकल, ग्रामीण
Villagers of Thoran Khandshi maval raise voices against Tata company Project

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शिरोटा वन बचाव संघाच्या वतीने थोरण–खंडशी गावात आयोजित करण्यात आलेली जनजागृती बैठक उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या बैठकीला गावातील ग्रामस्थ, महिला आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ‘टाटा गो बॅक!’ अशा घोषणा देत टाटा कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाचा निषेध नोंदवला. सह्याद्रीच्या निसर्गसंपदेचे, जंगलाचे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

विशेष म्हणजे, आगामी काळात जंगलतोड रोखण्यासाठी चिपको आंदोलन करण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली. एकही झाड तोडू देणार नाही, जंगल वाचवण्यासाठी शेवटपर्यंत उभे राहू, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

ग्रामस्थांचा स्पष्ट संदेश आहे की, आम्हाला विकासाच्या नावाखाली जंगलाचा विनाश नको. रोजगाराच्या आश्वासनांपेक्षा आमच्या पुढील पिढ्यांसाठी निसर्ग, पाणी, जंगल आणि सह्याद्री अधिक महत्त्वाचा आहे. ही केवळ एका गावाची लढाई नाही, तर मावळच्या निसर्गसंपदेच्या संरक्षणासाठी उभा राहिलेला जनआवाज आहे.

शिरोटा वन बचाव संघ – मावळ
शिरोटा वनबचाव संघ च्या वतीने धनंजय शेंडबळे,महेश महाजन,शैलेश जाधव, शंकर रेणुसे, adv पावले, बबन आलम, अमोल ठाकर, धनंजय गाडे, थोरण ग्रामस्त गणपत सावंत, शशिकांत ठाकर( मा.सरपंच) भीमराव ठाकर, काळूराम ठाकर, अरुण ठाकर, महेंद्र ठाकर(पोलीस पाटिल), अंकुश मांडूळे, अंकुश कदम, सोमनाथ ठाकर, मोहन सोनवणे, साबाजी मांडूळे, हनुमंत ठाकर, अनंत कुटे, सखाराम राचकर इत्यादी मान्यवर व महिला उपस्थित होत्या.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळातील ऊसतोड मजुरांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट ; दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत दिवाळी साजरी
– पाचाणे येथे शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप ; शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न
– श्री तीर्थक्षेत्र आई एकविरा देवी येथील मंदिर जतन, संवर्धन व परिसरातील विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात खळबळ! 20 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक रंगेहात जाळ्यात, ‘एसीबी’ची कारवाई

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Villagers of Thoran Khandshi maval raise voices against Tata company Project

थोरण–खंडशी ग्रामस्थांचा टाटा कंपनीविरोधात एल्गार! जंगलतोड रोखण्यासाठी चिपको आंदोलन करण्याची ग्रामस्थांची तयारी

November 18, 2026
bribe

लोणावळ्यात खळबळ! 20 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक रंगेहात जाळ्यात, ‘एसीबी’ची कारवाई

November 18, 2026
Theft-News

Lonavala Crime : लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री पाच दुकाने फोडली, १६ हजारांची रोकड लंपास

November 17, 2026
Pappu Kalekar from Maval selected for global wrestling referee examination to be held in Egypt

मावळातील पप्पू कालेकर यांची इजिप्त येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती पंच परिक्षेसाठी निवड; तर प्रविण राजिवडे राष्ट्रीय पंच परिक्षा अव्वल श्रेणीत उत्तीर्ण

November 17, 2026
water scarcity in Dhalewadi-Malewadi village stage lock the office protest at Mahagaon Gram Panchayat Maval

धालेवाडी-मालेवाडीत तीव्र पाणीटंचाई, पाण्यासाठी दोन तासांची पायपीट; महागाव ग्रामपंचायतीला ग्रामस्थांचे ‘टाळे ठोको’ आंदोलन

November 17, 2026
Union Home and Cooperation Minister Amit Shah two-day visit to Pune National Heavy Engineering Company Talegaon Dabhade Maval

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचा दोन दिवसीय पुणे दौरा; मावळातील नॅशनल हेव्ही इंजिनिअरिंग कंपनीच्या पुनर्निर्माणाचे आज भूमिपूजन

November 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.