Dainik Maval News : मावळ तालुक्यातील स्थानिक विकास सोसायट्यांपैकी प्रमुख असलेल्या शिवली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब कोंडिबा जाधव यांची निवड झाली. याबद्दल मावळ भाजपा नेते रविंद्र भेगडे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले.
सहकार क्षेत्र हे ग्रामीण विकासाचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असून, शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या माध्यमातून सभासदांचे हीत जपले जाईल आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून गावच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास रविंद्र भेगडे यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते माऊली आडकर, सेवा सोसायटीचे संचालक रमेश आडकर, लक्ष्मीबाई आडकर, भिकू लोहार, तुकाराम आडकर, दत्तात्रय आडकर, शरद घारे, भरत कदम, शंकर महाराज आडकर, मा. जिल्हा परिषद सदस्य किसन कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळातील ऊसतोड मजुरांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट ; दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत दिवाळी साजरी
– पाचाणे येथे शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप ; शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न
– श्री तीर्थक्षेत्र आई एकविरा देवी येथील मंदिर जतन, संवर्धन व परिसरातील विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश


