डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे नाताळ सण आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी. या काळात घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असते. मग कुठे फिरायला जाणे असो किंवा अन्य काही. तसेच राहत्या ठिकाणीही सेलिब्रेशनचे विशेष नियोजन केले जाते. अनेकजण एकत्र येऊन वेगवेगळे प्लॅन करत असतात. यासह दिनांक 1 जानेवारी हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो, या दिवशी विजयस्तंभाला मानवंदाना देण्यासाठी लाखोंची गर्दी होते. ह्या सर्व महत्वांच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, परिसरात कायदा व सुव्यवस्थता राहावी, तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करून शांतता बाळगावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या सर्व पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात कामशेत शहर पोलिसांनी, आज (शुक्रवार, दि. 22 डिसेंबर 2023) रोजी कामशेत शहर पोलीस स्टेशन हद्दीत सकाळी 11 ते पाऊणे बारा दरम्यान रुट मार्च काढला. कामशेत स्टेशन रोड, श्री छञपती शिवाजी महाराज चौक, कामशेत बाजारपेठ, सराफ कट्टा गावठाण, रेल्वे स्टेशन, पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय आणि कॉलेज परिसर भागात मराठा आरक्षण आंदोलन, 1 जानेवारी शौर्य दिन, नाताळ सण आणि नववर्षाचे स्वागत या कार्यक्रमांच्या अनुषंगाने परिसरात शांतताअबाधित राहण्याकरिता पोलिसांनी हा रूट मार्च काढला. सदर रूट मार्चमध्ये 3 अधिकारी, पोलिस निरिक्षक श्री पाटील, सपोनि श्री नम, पोसइ शेडगे आणि 7 पोलीस अंमलदार, 4 होमगार्ड सहभागी झाले होते. ( route march by police in Kamshet on occasion of Christmas New Year and Shaurya Day )
अधिक वाचा –
– ‘देहूतील सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत झाल्या पाहिजेत’, प्रशासनाने कारवाई न केल्यास मनसेकडून ‘खळ्ळ-खट्याक’चा इशारा
– मोठी बातमी! जम्मू काश्मीरमधील राजौरीत लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, 4 जवान शहीद
– मोठी बातमी! तब्बल 40 ड्रोन्सचा वापर करुन ‘एनआयए’ने रोखले मुंबईवरील दहशतवादी हल्ले