व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची ‘पाऊणे दोन कोटींची चूक’, प्रकरण हलक्यात न घेता उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

घडलेला प्रकार हा गंभीर असल्याने नजर चुकीने घडला आहे किंवा त्यामागे काही खोडसाळपणाचा उद्देश आहे? याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आलीये.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 28, 2023
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या खात्यातून पाऊणे दोन कोटी रुपये चुकीच्या बँक खात्यात जमा झालेच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी मिलिंद अच्युत यांनी जिल्हाधिकारी आणि मावळ-मुळशी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. चुकीच्या बँक खाते क्रमांकामुळे जी रक्कम ठेकेदाराला जाणे अपेक्षित होती, ते पावणे दोन कोटी रुपये महावितरणच्या खात्यात जमा झाले. हा सारा भोंगळ कारभार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत घडला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सदर गलथान कारभाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी तळेगाव दाभाडे कृती समितीचे मिलिंद अच्युत यांनी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तळेगाव दाभाडे पोलीसांकडे केली आहे. दरम्यान महावितरणकडे नगरपरिषदेने रक्कम परत मिळावी यासाठी अर्ज केला आहे. अर्ज मिळाल्यानंतर रक्कम परत मिळण्यासाठी प्रक्रीया सुरु करण्यात येणार आहे. ( high level inquiry demands talegaon dabhade nagar parishad money transfer case )

प्रकरण काय?

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने कचरा व्यवस्थापन कॉन्ट्रॅक्टरला अदा करण्यात येणाऱ्या रकमेचा आरटीजीएस ॲप्लीकेशन फॉर्म वर अकाउंट नंबर चुकीचा लिहिल्याने शासनाची पर्यायाने जनतेच्या टॅक्स स्वरूपातील रकमेची हेळसांड झाली. सुमारे 1 कोटी 49 लाख 39 हजार 279 रुपये आणि 21 लाख 14 हजार 726 इतकी रक्कम हलगर्जी पणामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या खात्यात जमावर्ग झाली.

मिलिंद अच्युत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रक्कम कचरा ठेकेदाराला न मिळाल्याने सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. हा सर्व प्रकार गंभीर असून नगरपरिषदेचे प्रमुख या नात्याने मुख्याधिकारी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी. घडलेला प्रकार हा गंभीर असल्याने नजर चुकीने घडला आहे किंवा त्यामागे काही खोडसाळपणाचा उद्देश आहे? याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी मिलिंद अच्युत यांनी केली आहे.

अधिक वाचा –
– मावळातील ‘दादा’ गटाची ताकद दिसणार! राष्ट्रवादीकडून आंदर मावळ विभागात शुक्रवारी स्नेह मेळाव्याचे आयोजन
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज वडगावात 1 कोटी 10 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन
– हॉटेल, चायनीज सेंटरमध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची आता खैर नाही! वडगाव पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई


Previous Post

श्रीविठ्ठल मंदिर संस्थान तळेगांव दाभाडे यांच्या वतीने श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन

Next Post

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंदर मावळातील पहिल्या इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
annual-convocation

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंदर मावळातील पहिल्या इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.