पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात 233 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे. इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आंबेगाव आणि बारामती तालुक्यातील प्रत्येकी 10, भोर 7, दौंड आणि इंदापूर प्रत्येकी 1, हवेली 17, जुन्नर 26, खेड 8, मावळ 36, मुळशी 28, पुरंदर 9, शिरुर 12 आणि वेल्हे तालुक्यातील 68 अशा जिल्ह्यातील एकूण 233 गावांत रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्यात येणार आहे. ( Call to apply for cheap grain shop license in rural areas of Pune district know application process )
अशी आहे अर्ज प्रक्रिया –
रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात गावांची नावे, सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधित तहसिल कार्यालयाच्या पुरवठा शाखेत याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.
अधिक वाचा –
– वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निलेश म्हाळसकर बिनविरोध । Vadgaon Maval
– पवनानगर येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा । Pavananagar
– बापरे बाप! लोणावळा उपविभागात तब्बल 510 वाहन चालकांवर कारवाई, 3 लाख 61 हजारांचा दंड वसूल । Lonavala News