व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आनंदाची बातमी! स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत लोणावळा नगरपरिषदेची सर्वोच्च कामगिरी, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव । Lonavala

गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकारतर्फे (एमओएचयुए) तर्फे देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ चा निकाल नुकताच जाहीर झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 9, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Lonavala-Municipal-Council

Photo Courtesy : Team Dainik Maval


गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकारतर्फे (एमओएचयुए) तर्फे देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ चा निकाल नुकताच जाहीर झाला. यात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदांनी सलग दुसऱ्यांदा देशपातळीवर सर्वोच्च कामगिरी केली आहे. यामध्ये सासवड आणि लोणावळा नगरपरिषदांचा पहिल्या तीन क्रमांकांच्या पुरस्कारांमध्ये समावेश आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सासवड व लोणावळा नगरपरिषदेस 1 लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येच्या वर्गवारीमध्ये पुरस्कार प्राप्त झाला असून 11 जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते या नगरपरिषदांना गौरविण्यात येणार आहे. माझी वसुंधरा 4.0 मध्ये राज्यपातळीवर सर्वोत्कृष्ट जिल्हा व सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी, असा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर कामगिरीमध्ये सातत्य राखून जिल्ह्याने स्वच्छ सर्वेक्षण क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. ( lonavala nagar parishad best performance in swachh survekshan 2023 award will be given by president )

  • ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रथम तीन क्रमांकामध्ये येण्यासाठी आठ ते दहा शहरांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. यामध्ये बारामती, इंदापूर, जेजुरी, शिरुर, भोर, सासवड, लोणावळा यांचा समावेश असून यापैकी प्रत्येक नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यापूर्वी विविध गटामध्ये राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त केलेले आहेत.

सासवड नगरपरिषदेने या स्पर्धेकरिता जय्यत तयारी केली होती. त्याअंतर्गत घनकचऱ्यावर 100 टक्के प्रक्रिया, 40 ते 50 टक्के सांडपाण्याचा पुर्नवापर, शहर सौंदर्यीकरणांतर्गत शहरात 18 ठिकाणी विविध शिल्पांची उभारणी, प्लॅस्टीकचा रस्त्यांच्या कामासाठी पुर्नवापर, बांधकाम व इतर साहित्यांची योग्य विल्हेवाटीची व्यवस्था केली असून टाकाऊ वस्तू पासून विविध शिल्प आकारलेले ‘वेस्ट टू वंडर पार्क’ आकारले आहे. शहराला थ्री स्टार व वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे.

  • लोणावळा नगरपरिषदेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी पूर्ण कार्यक्षमतेने सुरू केला. घनकचऱ्यावर 100 टक्के प्रक्रिया, शहरातील 40 ते 50 सांडपाण्याचा पुर्नवापर, शहरात रिड्यूस, रियूज, रिसायकल (आरआरआर) केंद्राची स्थापना करुन 2 टन इतक्या वस्तू 1 हजार 100 पेक्षा जास्त लोकांकडून जमा केल्या व त्यातील 1.5 टन वस्तू गरजू लोकांना देण्यात आल्या. गेल्या वर्षीदेखील जिल्ह्यातील लोणावळा, सासवड, बारामती आणि इंदापूर शहरांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले होते.

“स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत लोणावळा आणि सासवड नगरपरिषदेने विशेष मेहनत घेऊन नाविन्यपूर्ण कल्पना राबविल्यामुळे तसेच नागरीकांना सहभागी करुन घेतल्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदाही आगामी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत.” डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

अधिक वाचा –
– भटके-विमुक्त समाजासाठी शासनाचा पुढाकार; शिधापत्रिका वितरणासाठी दिनांक 15 जानेवारी ते 14 मार्चपर्यंत विशेष मोहिम
– ‘मुलाला नोकरीला लावतो’ असे सांगत बापाची 5 लाखाची आर्थिक फसवणूक; तळेगाव दाभाडे येथील धक्कादायक प्रकार । Maval Crime
– अबब… विद्यार्थ्याला मिळाले 200 पैकी 214 गुण! तलाठी भरती परीक्षेत नेमका काय घोटाळा झालाय? वाचा सविस्तर । Talathi Bharti


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा जेसीबी जळून खाक, जबाबदार कोण? । Talegaon Dabhade

Next Post

कामशेतजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने अनोळखी वाटसरूचा मृत्यू । Kamshet Accident

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Unknown-Dead-Body

कामशेतजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने अनोळखी वाटसरूचा मृत्यू । Kamshet Accident

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.