व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शरद मोहोळ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! पोलिसांनी तपासल्या 18 हजार ऑडिओ क्लिप, एकाला अटक । Sharad Mohol Murder Case

शरद मोहोळ हत्या प्रकरणी (Sharad Mohol Murder Case) गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर (वय 31, रा. दत्तवाडी) याला मंगळवारी (दि. 6) सायंकाळी अटक केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 7, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Sharad-Mohol-Murder-Case

Photo Courtesy : Team Dainik Maval


शरद मोहोळ हत्या प्रकरणी (Sharad Mohol Murder Case) गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर (वय 31, रा. दत्तवाडी) याला मंगळवारी (दि. 6) सायंकाळी अटक केली. कोथरुडमधील सुतारदरा परिसरात 5 जानेवारी रोजी शरद मोहोळ याची साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी मिळून हत्या केली होती. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी पथके बनवून प्रमुख आरोपींना अटक केली होती. तेव्हापासून शरद मोहोळ खून प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यात ऑडिओक्लिप तपासणी नंतर गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर याला अटक केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पोलिसांनी ह्या प्रकरणाचा तपास करत असताना 18 हजार 827 ऑडिओ क्लिप तपासल्या. त्यातील 10 हजार 500 ऑडिओ क्लिपमध्ये 6 ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळून आल्या. साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्यातील संभाषणात अभिजित मानकर याचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आलीये. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, पोलिस आयुक्त सुनील तांबे आणि सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर हे यावेळी उपस्थित होते. ( Sharad Mohol Murder Case Update from Pune Crime Branch )

दरम्यान, शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, अ‍ॅड. रवींद्र पवार, अ‍ॅड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे आणि गणेश निवृत्ती मारणे यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– दुर्दैवी! धरणात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, लोणावळा जवळील तुंगार्ली जलाशयात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू । Lonavala News
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांना पितृशोक! Vasantrao Khandge Passed Away
– महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 5 हजार डिझेल बसगाड्यांचे रुपांतर ‘एलएनजी’ इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये होणार


Previous Post

राज्यातील जुणे महसूल कायदे बदलणार? महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल होणार? सरकारकडून समिती गठीत

Next Post

तळेगावच्या एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूलचे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ampros-International-School

तळेगावच्या एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूलचे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.