श्री क्षेत्र देहू नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, माजी उपसरपंच स्वप्निल काळोखे यांच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला बालचमूंचा उदंड प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील विजेत्यांना मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. ( Fort Build Competition Dehu Gaon Maval Prize Distribution By MLA Sunil Shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भुमी आहे. त्यांच्या पराक्रमाची, इतिहासाची साक्ष असलेल्या गडकिल्ल्यांची माहिती लहान वयातच कळणे आवश्यक आहे. छत्रपतींच्या शौर्य आणि कर्तृत्वाचा इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीने अभिमानाने जपला पाहिजे. त्यासाठी अशा किल्ले स्पर्धांच्या माध्यमातून शिवकालीन गडकोटांच्या ऐतिहासिक घटनांना उजाळा मिळतो व अशा स्पर्धांमधून बालगोपाळांना देखील प्रेरणा मिळते,” असे मत यावेळी आमदार सुनिल शेळकेंनी व्यक्त केले.
संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष नितीन महाराज मोरे, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, जालिंदर महाराज काळोखे, कांतीलाल काळोखे, संतोष काळोखे, नंदुभाऊ काळोखे, बाळासाहेब काळोखे, प्रीतम वारघडे, चंद्रकांत दाभाडे, संजय बाविस्कर, नगरसेवक योगेश परंडवाल, प्रवीण काळोखे, योगेश काळोखे, सुधीर काळोखे, मयुर शिवशरण, आनंदा काळोखे, रोहित काळोखे, नगरसेविका सपना मोरे, पुजा दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंची मावळमधील अतिदुर्गम गावात भेट, कळकराई ग्रामस्थांची दिवाळी केली गोड
– Video : पोहण्याचा मोह जीवावर बेतला, आडगाव येथे 2 मुलांचा बुडून मृत्यू