‘आज सोमवार, दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी मी 85-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.’ असे ट्विट करून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी राजकीय भूकंप घडवला आहे. काँग्रेसचे भोकर विधानसभेचे आमदार, तसेच राज्याचे दोनवेळचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नार्वेकरांनी तो स्विकारला आहे. तसेच चव्हाण यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्याकडे काँग्रेस सोडत असल्याचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
नाना पटोले यांना लिहिले पत्र –
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक पत्र लिहीले आहे. या पत्राच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याच्या पत्रात असे म्हटले की, मी दिनांक 12 फेबुवारी 2024 मध्यान्हानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे, धन्यवाद. अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याचं जे पत्र लिहिलं त्यावर माजी विधानसभा सदस्य, भोकर विधानसभा मतदारसंघ जिल्हा नांदेड असा उल्लेख आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट होत आहे.
आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.
Today i.e. on Monday, February 12, 2024, I have tendered my resignation as Member of Legislative Assembly (MLA) from 85-Bhokar…— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 12, 2024
अशोक चव्हाण हे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचे सांगितले जातंय. तसेच चव्हाण हे दिल्लीत जाऊन भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रात पुढच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथही घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. ( Ashok Chavan Former Chief Minister of Maharashtra resigns from MLA And Congress Party )
अशोक चव्हाण भाजपवासी झाले.विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले.
एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?
आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय?
आपल्या देशात काहीही घडू शकते!… pic.twitter.com/tjX1XzL3Ns— Sanjay Raut (@rautsanjay61) February 12, 2024
अधिक वाचा –
– इंद्रायणी नदी प्रदूषणावर खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत उठवला आवाज । Indrayani River Pollution Video
– शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत आंदर मावळमधील भोयरे गावात आठवडे बाजाराचे उद्धाटन!
– तळेगाव येथे नागरी सहकारी बँकांच्या वसूली अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय ‘कर्ज वसूली प्रशिक्षण शिबिर’ । Talegaon Dabhade