व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 6, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राजकीय भूकंप! अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली, आमदारकीचाही राजीनामा, भाजपवासी होणार? जाणून घ्या सविस्तर । Ashok Chavan Resignation

काँग्रेसचे भोकर विधानसभेचे आमदार, तसेच राज्याचे दोनवेळचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नार्वेकरांनी तो स्विकारला आहे. तसेच चव्हाण यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्याकडे काँग्रेस सोडत असल्याचाही राजीनामा दिला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 12, 2024
in महाराष्ट्र
Ashok-Chavan-congress-resign

Photo Courtesy : Team Dainik Maval


‘आज सोमवार, दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी मी 85-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.’ असे ट्विट करून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी राजकीय भूकंप घडवला आहे. काँग्रेसचे भोकर विधानसभेचे आमदार, तसेच राज्याचे दोनवेळचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नार्वेकरांनी तो स्विकारला आहे. तसेच चव्हाण यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्याकडे काँग्रेस सोडत असल्याचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

नाना पटोले यांना लिहिले पत्र –
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक पत्र लिहीले आहे. या पत्राच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याच्या पत्रात असे म्हटले की, मी दिनांक 12 फेबुवारी 2024 मध्यान्हानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे, धन्यवाद. अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याचं जे पत्र लिहिलं त्यावर माजी विधानसभा सदस्य, भोकर विधानसभा मतदारसंघ जिल्हा नांदेड असा उल्लेख आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट होत आहे.

आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.
Today i.e. on Monday, February 12, 2024, I have tendered my resignation as Member of Legislative Assembly (MLA) from 85-Bhokar…

— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 12, 2024

अशोक चव्हाण हे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचे सांगितले जातंय. तसेच चव्हाण हे दिल्लीत जाऊन भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रात पुढच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथही घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. ( Ashok Chavan Former Chief Minister of Maharashtra resigns from MLA And Congress Party )

अशोक चव्हाण भाजपवासी झाले.विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले.
एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?
आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय?
आपल्या देशात काहीही घडू शकते!… pic.twitter.com/tjX1XzL3Ns

— Sanjay Raut (@rautsanjay61) February 12, 2024

अधिक वाचा –
– इंद्रायणी नदी प्रदूषणावर खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत उठवला आवाज । Indrayani River Pollution Video
– शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत आंदर मावळमधील भोयरे गावात आठवडे बाजाराचे उद्धाटन!
– तळेगाव येथे नागरी सहकारी बँकांच्या वसूली अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय ‘कर्ज वसूली प्रशिक्षण शिबिर’ । Talegaon Dabhade


dainik maval ads may 2025

Previous Post

वडगावात 1 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा, नवजोडप्यांना मिळणार अनेक वस्तू, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी । Vadgaon Maval

Next Post

देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून नवीन महानगरपालिका बनणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
DCM-Ajit-Pawar

देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून नवीन महानगरपालिका बनणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval-Taluka

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा । Pawana Dam Updates

July 5, 2025
Maval Bhushan MLA Late Krishnarao Bhegde condolence meeting

मावळभूषण आमदार स्व. कृष्णराव भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन

July 5, 2025
Devshayani-Ashadhi-Ekadashi

आषाढी एकादशीनिमित्त रविवारी वडगाव शहरातील मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Vadgaon Maval

July 5, 2025
Wildlife conservationist Maval organization saves injured monkey from Jambhul Phata Maval

जांभूळ फाटा येथे जखमी वानरास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान । Maval News

July 4, 2025
Big News Conspiracy to murder MLA Sunil Shelke exposed SIT formed

खळबळजनक! आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट, चौकशीसाठी ‘एसआयटी’ची स्थापना, गृह राज्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

July 4, 2025
High Security Registration Number Plate

महत्वाची बातमी ! जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविण्यासाठी १५ ऑगस्ट ही अंतिम मुदत

July 4, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.