व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! अजित पवारांचे सर्व आमदार पात्र, राहुल नार्वेकर यांचा निकाल, शरद पवार गटाचं काय झालं? वाचा सविस्तर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर समोर आला आहे. Ncp Mla Diwqalification Case Ajit Pawar faction is real NCP rules Maharashtra speaker Rahul Narwekar.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 15, 2024
in महाराष्ट्र
Sharad-Pawar-Ajit-Pawar

Photo - Dainik Maval Graphics Team


राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर समोर आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर काही महिने याप्रकरणी सुनावणी झाली. नार्वेकर यांनी दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेले पुरावे, दस्तावेज तपासले. तसेच दोन्ही गटांमधील नेत्यांची उलटतपसाणी करून अखेर याप्रकरणाचा निकाल सुनावला आहे. नार्वेकर यांनी शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. तसेच अजित पवार गटातील आमदारांना पात्र ठरवलं आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा)

राष्ट्रवादीतील फूट आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय दिला आहे. विधिमंडळ पक्षातील बहुमत हा एकमेव निकष असल्याचं सांगत अजित पवार गटाला 53 पैकी 41 आमदारांचा पाठिंबा असल्याने अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला. अजित पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची शरद पवार गटाची मागणीही नार्वेकर यांनी फेटाळून लावली. त्यामुळे अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र ठरले आहेत. पक्षघटना, नेतृत्वरचना आणि विधिमंडळ संख्याबळ लक्षात घेऊन निर्णय दिल्याचंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. (Ncp Mla Diwqalification Case Ajit Pawar faction is real NCP rules Maharashtra speaker Rahul Narwekar)

नार्वेकर निकाल वाचताना म्हणाले, ‘अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला विधानसभेच्या एकूण 53 आमदारांपैकी 41 आमदारांचा पाठिंबा आहे. तर शरद पवार यांच्याबरोबर केवळ 12 आमदार आहेत. शरद पवार गटाने या दाव्याला कुठेही आव्हान दिलेलं नाही. त्यामुळे दोन्ही गटांचं संख्याबळ इथे स्पष्ट होत आहे. त्यानुसार अजित पवार गटाकडे विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. अजित पवार गटाकडे पदाधिकारी आणि नेत्यांच्या मतांचा अधिक पाठिंबा आहे. यासंबंधी अजित पवार गटाने सादर केलेल्या दस्तावेजांना शरद पवार गटाने आव्हान दिलेलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाला विधीमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे.’

पात्र ठरलेले 41 आमदार –
सरोज अहिरे, धर्माबाबा आत्राम, बाळासाहेब अजबे, राजू कारेमोरे, आशुतोष काळे, माणिकराव कोकाटे, मनोहर चांद्रिकेपुरे, दीपक चव्हाण, संग्राम जगताप, मकरंद पाटील, नरहरी झिरवाळ, सुनील टिंगरे, अदिती तटकरे, चेतन तुपे, दौलत दरोडा, राजू नवघरे, इंद्रनील नाईक, मानसिंग नाईक, शेखर निकम, अजित पवार, नितीन पवार, बाबासाहेब पाटील, अनिल पाटील, राजेश पाटील, दिलीप बनकर, अण्णा बनसोडे, संजय बनसोडे, अतुल बेनके, दत्तात्रय भरणे, छगन भुजबळ, यशवंत माने, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप मोहिते, निलेश लंके, किरण लहमते, दिलीप वळसे, राजेंद्र शिंगणे, बबनराव शिंदे, सुनील शेळके, प्रकाश सोळंके.

अधिक वाचा –
– राज्यात ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वाळू विक्रीचे दर निश्चित करणार; शिंदे सरकारचे एकापेक्षा एक मोठे निर्णय, वाचा सविस्तर
– भव्य बैलगाडा शर्यत.. कुस्तीचा जंगी आखाडा आणि मनोरंजनाची मेजवानी! टाकवे गावच्या यात्रेला जल्लोषात सुरुवात
– ‘तालुक्याचं गाव पण विजेचा बारा महिने लपंडाव’, वडगाव शहरातील वीज विषयक समस्यांबाबत राष्ट्रवादीचे महावितरणला निवेदन । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

निमगाव येथील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी लिफ्टची सोय करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश । Pune News

Next Post

खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील ‘या’ आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा होणार सन्मान । MP Shrirang Barne

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mp-shrirang-barne

खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील 'या' आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा होणार सन्मान । MP Shrirang Barne

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.