वडगाव मावळ शहरात वीज विषयक समस्यांनी सामान्यांना अक्षरशः हैराण करून ठेवले आहे. वेळीअवेळी विजपुरवठा खंडित होणे ही तर सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यात बुधवारी वडगाव शहरातील खंडोबा मंदिर परिसरातील विजपुरवठा दिवसभर खंडीत झाला होता. शहरातील नागरिकांच्या वीज पुरवठ्याबाबत असलेल्या समस्या लक्षात घेत आज, बुधवार (दि. 14) रोजी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने विजेच्या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वडगाव येथील कार्यालयात निवेदन दिले. वडगाव शहरातील विजेचा सततचा लपंडाव, प्रलंबित असलेली महावितरणची कामे आणि काही मागण्यांबाबत राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी महावितरण शाखा अभियंता कार्यालयात जाऊन निवेदन दिले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
निवेदन देताना व्हॅलेंटाईन डे चे प्रतिक म्हणून गुलाबपुष्प महावितरण अधिकाऱ्यांना देऊन प्रेमाच्या शब्दात त्यांना पदाधिकाऱ्यांनी आपले निवेदन सादर केले. महावितरणचे अधिकारी मनोज नेमाडे आणि कनिष्ठ अभियंता राहुल लकडे यांनी हे निवदेन स्विकारले. यावेळी विशाल वहिले यांनी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याबाबत तोंडी तक्रारही केली. (NCP Leader gave Letter to Mahavitaran Officer Regarding Electricity Problems In Vadgaon Maval)
निवेदन देताना पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिले, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव पंकज भामरे, वडगाव शहर राष्ट्रवादी पदवीधर सेल अध्यक्ष सौरभ सावले, शैलेश खैरे, अभिषेक ढोरे उपस्थित होते. वडगाव शहरातील प्रभाग क्रमांक 6 व 7 मधील पंचमुखी मारुती मंदिर परिसर, खंडोबा मंदिर परिसर, मल्हार रेसिडेन्सी, एकविरानगर कॉलनी, लक्ष्मी नगर कॉलनी आणि परिसरातील नागरिकांना दररोज विद्युत पुरवठा खंडित होऊन नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे अधिकाऱ्यांना कळकळीने सांगण्यात आले.
खालील समस्या मांडत मागण्या करण्यात आल्या –
1. वडगाव मावळ स्मशानभूमीतील जो डीपी बॉक्स आहे तो नादुरुस्त अवस्थेत आहे तो बॅाक्स बदलावा.
2. अनेक ठिकाणी खांबावरील तारांना झोळ निर्माण झाल्यामुळे वारंवार फ्युज जात आहे.
3. वडगांव स्मशानभूमी जवळील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवावी.
4. उन्हाळ्यात ट्रान्सफॉर्म गरम होऊन त्यातनं ऑइल बाहेर येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण त्याला ट्रान्सफॉर्मर कव्हर बसून घ्यावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावात गुरूवारी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांबाबत जनजागृती शिबिराचे आयोजन । Maval News
– तळेगाव येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान । Talegaon Dabhade
– पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ दिवशी जमा होणार 16वा हप्ता, लाभार्थ्यांच्या समावेशासाठी विशेष मोहिम । PM Kisan Yojna