व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 16, 2026
in महाराष्ट्र, देश-विदेश
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत होणार आहे. विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधानभवन येथे आयोजित बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार,दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन आणि कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतला पावसाळी अधिवेशन २०२६ पूर्वतयारीचा आढावा
आगामी पावसाळी अधिवेशन २०२६ सुरळीत, सुरक्षित व नियोजनबद्धरित्या पार पडावे या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कामकाज करावे. पावसाची शक्यता लक्षात घेता सुरक्षित मंडप, सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात कर्मचाऱ्यांसाठी अन्न पाकिटे, स्वच्छ आणि सुसज्ज उपहारगृह याबाबत अत्यंतीक दक्षता घेण्यात यावी. विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येऊन गर्दी नियंत्रित व्हावी यादृष्टीने सुरक्षा यंत्रणेने नियोजन करावे, त्याचप्रमाणे डिजिटल प्रवेशपास व्यवस्था सुरु करावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. विधानभवन येथे २०२६ च्या दुसऱ्या म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने पूर्वतयारीसंदर्भात बैठक विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, वाहनतळ व्यवस्था, अधिवेशन कालावधीतील अनुभवी डॉक्टरांची उपलब्धता, वैद्यकीय सुविधा, उपहारगृहामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा, उपहारगृहातील स्वच्छता व खाद्यपदार्थांची तपासणी, विधानभवन परिसरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, अखंडित पाणीपुरवठा, दूरध्वनी व इंटरनेट सुविधा, रेल्वे आरक्षण तसेच आपत्कालीन व्यवस्था या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

अधिवेशन कालावधीत अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवेशासाठी पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली असून प्रवेश नियंत्रण कडक ठेवावे, वाहनतळ व्यवस्था उचित असावी तसेच सुरक्षा, स्वच्छता व आपत्कालीन सेवा पूर्णतः सज्ज ठेवाव्यात, असे स्पष्ट निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने पुरेसा बंदोबस्त ठेवावा, सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, सार्वजनिक बांधकाम विभागाने सभा मंडप व पूरक कामे तात्काळ पूर्ण करावीत, विद्युत विभागाने अखंडित सेवा सुनिश्चित करावी तसेच उपहारगृह अधिवेशन काळात अधिक वेळ सुरू ठेवून खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. रेल्वे विभागाने दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या प्रवासाची सुविधा अग्रक्रमाने उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे वार्तांकनासाठी येणाऱ्या पत्रकारांसाठी मंडप आणि आवश्यक सुविधा सुनिश्चित कराव्यात, असेही सभापतींनी नमूद केले.

या बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ जितेंद्र भोळे, सचिव-२ मेघना तळेकर इटकेलवार, सचिव-३ डॉ. विलास आठवले, सचिव-४ शिवदर्शन साठ्ये, मा. सभापती यांचे सचिव पंडित खेडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विद्याधर पाटसकर, सहसंचालक वैद्यकीय शिक्षण डॉ. विवेक पाखमोडे, वैद्यकीय अधीक्षक सर जे जे रूग्णालय डॉ. संजय सुरासे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. प्रविण मुंडे, दक्षिण मुंबई पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत, सह आयुक्त अन्न व नागरी पुरवठा महेश चौधरी, उप संचालक आरोग्यसेवा डॉ. गोविंद चौधरी, यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन


dainik maval jahirat

Previous Post

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

Next Post

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.