व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ दिवशी जमा होणार 16वा हप्ता, लाभार्थ्यांच्या समावेशासाठी विशेष मोहिम । PM Kisan Yojna

शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी.एम.किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 13, 2024
in महाराष्ट्र, देश-विदेश
pm-kisan-samman-nidhi-yojana

File Image


शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. या मोहिमेंतर्गत ईकेवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी.एम.किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा. बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. पी. एम. किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याचा लाभ या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करण्यात येणार आहे. या मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधिन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी. या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana 16th installment Updates)

यापूर्वी राबविण्यात आलेल्या 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या 45 दिवसांच्या मोहिमेदरम्यान 1 लाख 4 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच 3 लाख 1 हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘निर्भय कन्या अभियान’ व्याख्यानमाला उत्साहात संपन्न । Talegaon Dabhade
– मोठी बातमी! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाचे 6 गावांमध्ये छापे; 995 लीटर गावठी दारूसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त । Pune News
– Breaking! पुन्हा ब्लॉक..! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा । Block On Mumbai Pune Expressway


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरातील 300 मुलांना मोरया प्रतिष्ठानने घडवली तोरणा किल्ल्याची सफर । Vadgaon Maval

Next Post

तळेगाव येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Narayan-Rane-Talegaon-Dabhade

तळेगाव येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.