व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरातील 300 मुलांना मोरया प्रतिष्ठानने घडवली तोरणा किल्ल्याची सफर । Vadgaon Maval

मोरया प्रतिष्ठान मार्फत वडगाव मावळ शहरातील लहान मुलांसाठी सफर गड दुर्गांची हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 13, 2024
in लोकल, शहर
Torna-Fort-Trip

Photo Courtesy : Team Dainik Maval


मोरया प्रतिष्ठान मार्फत वडगाव मावळ शहरातील लहान मुलांसाठी सफर गड दुर्गांची हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनप्रवास मुलांना प्रत्यक्ष गडकोटांची सफर करून समजून सांगितला जात आहे. दर महिन्यातील एका रविवारी एक किल्ला असा हा उपक्रम राबवला जात आहे. सर्वात आधी किल्ले शिवनेरी येथून उपक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर किल्ले रायरेश्वर आणि आता किल्ले तोरणा इथे मुलांना नेण्यात आले. शहरातील एकूण 300 मुलांना प्रतिष्ठानने तोरणा किल्ल्याची सफर घडवली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

रविवारी (दि. 11) रोजी पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील तोरणा उर्फ प्रचंडगड किल्ल्यावर सफर गड दुर्गांची उपक्रमाअंतर्गत तिसरी गडमोहिम आयोजित करण्यात आली होती. शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी, स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वराचे ठिकाण आणि त्यानंतर आता शिवरायांची जिंकलेला पहिला किल्ला म्हणजेच किल्ले तोरणा येथे मुलांना नेण्यात आले. मागील दोन मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा यावेळी सहभागी विद्यार्थी संख्या अधिक होती. (300 children from Vadgaon Maval made a trip to Torna Fort Through Morya Pratishthan)

वडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे व मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडत आहे. प्रतिष्ठानने रविवारी तोरणा किल्ल्यावर नेलेल्या मुलांमध्ये चौथी ते नववीपर्यंतचे मुलं-मुली सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मेडिकल किट व वैद्यकीय अधिकारीही सोबत होते. मोहिमेत मुलांना गडावरील वास्तूंची माहिती देण्यात आली आणि गडाचा इतिहास सांगण्यात आला. सर्व मुलांनी दिवसभर सहलीचा आनंद घेतला. पराग ढोरे, मकरंद ढोरे, सिद्धेश ढोरे यांचे यामध्ये मोलाचे सहकार्य लाभले.

“मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथून पुढेही शिवरायांच्या गडदुर्ग अभ्यासाच्या मोहिमा अशाच अविरतपणे सुरू राहतील. अशा सहलींमुळे मुलांचा शारीरिक कस पणाला लागेल. त्यातून आपली भावी पिढी तंदुरुस्त होईल आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढेल.” मयूर ढोरे आणि अबोली ढोरे

अधिक वाचा –
– मोठी बातमी! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाचे 6 गावांमध्ये छापे; 995 लीटर गावठी दारूसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त । Pune News
– Breaking! पुन्हा ब्लॉक..! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा । Block On Mumbai Pune Expressway
– शिवस्मारकाची उभारणी ते सार्वजनिक सभागृह, जीम-योगा सेंटर; कान्हे ग्रामपंचायतमधील विविध कामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन


Previous Post

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बुधवारी पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यात भव्य रॅलीचे आयोजन, पाहा रॅलीचा मार्ग

Next Post

पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ दिवशी जमा होणार 16वा हप्ता, लाभार्थ्यांच्या समावेशासाठी विशेष मोहिम । PM Kisan Yojna

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
pm-kisan-samman-nidhi-yojana

पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट! 'या' दिवशी जमा होणार 16वा हप्ता, लाभार्थ्यांच्या समावेशासाठी विशेष मोहिम । PM Kisan Yojna

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.