व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

लोणावळा शहरातील अॅड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल मध्ये वसंत व्याख्यानमालेला सोमवारी 20 एप्रिल पासून सुरुवात झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 22, 2026
in लोकल, शहर
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा (प्रतिनिधी) : 24 वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प हे मायलेकरं या विषयावरील अभिवाचनाने गुंफण्यात आले. अभिनेते डॉक्टर गिरीश ओक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व चैत्राली अभ्यंकर यांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये वेगवेगळ्या कवितांचे व कथांचे अभिवाचन करत रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली.

लोणावळा शहरातील अॅड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल मध्ये वसंत व्याख्यानमालेला सोमवारी 20 एप्रिल पासून सुरुवात झाली. आई व मुलांमधील संवाद यावर आधारित मायलेकरं या विषयावर मान्यवरांनी पहिल्या दिवशीअभिवाचन केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात श्रीमती चिन्मयी सुमीत यांनी ‘शाळा आमची मराठी’ या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. “मी अजूनही मराठीच्या वाटेवरची विद्यार्थिनी आहे,” असे नम्रपणे सांगत त्यांनी सतत शिकत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले

यावेळी विद्या निकेतन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. माधवराव भोंडे, नगरसेवक अनिल गवळी, संस्थेच्या सचिव व व्याख्यानमालेच्याविश्वस्थ अध्यक्ष राधिका भोंडे, वसंत व्याख्यानमाला समिती 2026 चे अध्यक्ष नितीन तिकोणे सचिव संजय वाड यांच्यासह समिती सदस्य व लोणावळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संस्कृती ही महान संस्कृती असल्याचे सांगत “अतिथी देवो भव” या मूल्याची आठवण करून दिली. संस्कार म्हणजे केवळ बाह्य परंपरा नसून भावना, संवेदना आणि माणुसकी जपणे हेच खरे संस्कार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाषा ही संवादाचे प्रभावी माध्यम असून ती माणसांना आणि मनांना जोडते, त्यामुळे कोणत्याही भाषेला विरोध न करता सर्व भाषांचा सन्मान करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठी शाळेच्या सध्याच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “मराठीचा अभिमान केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता तो कृतीत उतरायला हवा.” इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी शाळा बंद पडत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

पालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्ट केले की, “इंग्रजी शिकणे आणि इंग्रजी माध्यमातून शिकणे या दोन भिन्न गोष्टी आहेत.” मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पहिली आठ वर्षे तणावरहित आणि आनंदी शिक्षणाची असावीत, असे सांगत मातृभाषेत शिक्षण घेतल्यास मुलांचा भावनिक, बौद्धिक व सामाजिक विकास अधिक प्रभावी होतो, असे त्यांनी उदाहरणांसह मांडले.

संस्कृती हीच आपली खरी ओळख असल्याचे सांगत जागतिक पातळीवर यशस्वी होण्यासाठी आपल्या मातृभाषेशी जोडलेले राहणे आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला. मराठी भाषा आणि शाळा टिकवण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी पालक, शिक्षक आणि समाज यांनी एकत्र येऊन विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती राबवावी तसेच मराठी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन द्यावे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम
– लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ
– वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन
– मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक


dainik maval jahirat

Previous Post

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

Next Post

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.