Dainik Maval News : महाराष्ट्र शासनाने वडगाव शहराची ग्रामीण व शहरी अशी केलेली चूक त्वरित दुरुस्त करून वडगाव शहर नागरिकांना गॅस सिलेंडर बुकिंग 25 दिवसात करून द्यावी, अशी मागणी नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी केली आहे.
शासन स्तरावर शहरी भागासाठी गॅस बुकिंग 25 दिवस, ग्रामीण भागासाठी 45 दिवस असा कालावधी केला असताना वडगाव नगरपंचायत हे अधिकृत नागरी क्षेत्र असतानाही केंद्र शासनाच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने मार्च 2026 मध्ये सुधारित एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंग नियम जाहीर केले असूनही तेल कंपन्यांच्या (OMC) डेटाबेस मध्ये वडगाव शहराला चुकीने ‘ग्रामीण’ श्रेणीत वर्गीकृत केले गेले आहे.
शासनाच्या या गंभीर चुकीमुळे येथील हजारो नागरिकांना, व्यवसायिकांना आवश्यकतेपेक्षा २० हून अधिक दिवस म्हणजेच तब्बल 45 दिवस गॅस सिलेंडर बुकिंगसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे, त्यामुळे वडगाव शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
वडगाव कातवी शहरातील नागरिकांना निर्माण होणाऱ्या अडचणी शासनाने ग्रामीण व शहरी भागाची चूक दुरुस्त करून नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात यासाठी वडगाव नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.
वडगाव शहरातील रहिवाशांसाठी महत्वाचा असलेला प्रश्न जर लवकरात लवकर मार्गी लागला नाही तर मोठे जन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांनी दिला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम
– लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ
– वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन
– मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

