व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

विकास कामांना गती द्या, पावसाळ्यापूर्वीची कामे हाती द्या - खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 21, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत सुरु असलेल्या विकास कामांना गती द्यावी. उन्हाळा सुरु असल्याने पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. पाण्याच्या तक्रारी येऊ देऊ नका, पावसाळ्यापूर्वीची कामे हाती घ्यावीत. प्रलंबित कामांचे प्रस्ताव तयार करुन राज्य शासनाकडे पाठवावेत. त्याला मान्यतेसह निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि आमदार सुनील आण्णा शेळके यांनी दिली.

Novel NIBR Ads

मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायतीच्या कामासंदर्भात खासदार खासदार बारणे आणि आमदार सुनील शेळके यांनी संयुक्तरित्या सोमवारी आढावा बैठका घेतल्या. याप्रसंगी सदरहू ठिकाणी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, संबंधित विभागाचे सर्व अधिकारी बैठकांना उपस्थित होते.

बैठकीत केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला गेला. तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. भविष्यातही निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही खासदार बारणे आणि आमदार शेळके यांनी दिली.

भुशी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण
लोणावळा पर्यटननगरी आहे. देशभरासह राज्यातील पर्यटक लोणावळ्यात येतात. भुशी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करावे. पावसाळ्यापूर्वीच्या कामांना गती द्यावी. नालेसफाई करावी. पावसाळ्यात कोठेही पाणी साचता कामा नये. पर्यटकांना त्रास होता कामा नये. पर्यटकांमुळे अर्थकारणाला चालना मिळते. त्यांना सर्व सुविधा दिल्या पाहिजेत. लोणावळ्या रेल्वे स्थानक परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी आहे. याबाबत रेल्वे विभागाबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. पर्यटननगरीसाठी राज्य सरकारकडून मोठा निधी मिळतो. त्याचा योग्य विनियोग करुन नियोजनबद्ध कामे करावीत.

खंडाळ्यातील उड्डाणपुलाची डागडुजी
रेल्वे विभागाच्या प्रलंबित कामांनाही केंद्र सरकारच्या माध्यमातून गती दिली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाला मान्यता मिळाली आहे. रेल्वेचे काम अंतिम टप्प्यात असून नगरपरिषदेने रस्त्याच्या कामाला गती द्यावी. नगरपरिषदेने त्याचा आढावा घेऊन काम मार्गी लावावे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून काही घरकुलांना मान्यता मिळाली आहे. त्यासाठीची जागा निश्चित करुन घरे बांधण्याला गती द्यावी. पुणे-मुंबई रस्ता लोणावळ्यातून जातो. या रस्त्याची देखभाल, दुरुस्ती एमएसआरडीसीकडे आहे. खंडाळ्यातील उड्डाणपुलाची डागडुजी, सुशोभीकरण करण्यात यावे.

Novel NIBR Ads

पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून निधी
वडगावमधील पोटोबा देवस्थान लगत असलेल्या तलावाचे सुशोभीकरण करावे. क्रीडांगण विकसित करावे. अमृत भारत योजनेअंतर्गत एसटीपी प्रकल्प उभारण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात यावा. तळेगाव दाभाडे शहरातील पाणीपुरवठा योजनेला मान्यता मिळाली आहे. योजना राबविण्यासाठी ११६ कोटी रुपये लागणार आहेत. त्यासाठी नगरविकास विभागाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तिन्ही नगरपरिषद, पंचायतीच्या हद्दीमध्ये क्रींंडागणे, ओपन जीम, शाळांसाठी स्मार्ट बोर्ड सीएसआरमधून उपलब्ध करुन दिले जातील. सुरु असलेल्या सर्व कामांना गती द्यावी. तीन महिन्यांनी पुन्हा आढावा घेण्यात येईल.

रेल्वेच्या प्रश्नांसदर्भात २८ एप्रिलला बैठक
मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ तिन्ही विधानसभा मतदारसंघातील रेल्वेच्या प्रश्नांसदर्भात २८ एप्रिल रोजी बैठक घेण्यात येणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर ही बैठक घेण्यात येणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम
– लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ
– वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन
– मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

Next Post

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.