व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

"कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांनाही शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे समान संधी मिळणे आवश्यक" - सुनेत्रा पवार

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 16, 2026
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : स्पर्धा, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नयेत, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हे येथे आयोजित ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६-२७’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिपाली हुलावळे, सुनीता येवले, शिक्षण विभागाचे उपसंचालक गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, गणेश ढोरे, विठ्ठल शिंदे, गणेश खांडगे, साहेबराव कारके यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे तसेच प्रत्येक शाळेत आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांनाही शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे समान संधी मिळणे आवश्यक आहे. यासाठी डिजिटल क्लासरूम, आधुनिक शैक्षणिक साधने आणि गुणवत्तापूर्ण पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अभ्यासाबरोबरच क्रीडा, कला आणि कौशल्यविकासालाही प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यात शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि संशोधन क्षेत्रातही प्रगती साधून मोठी स्वप्ने पूर्ण करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा परिषद शाळांचे रूपांतर आधुनिक, डिजिटल आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण संस्थांमध्ये करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक, पालक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली ती याच शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी कु. रुद्रा गणेश राजगुरे. चाचणी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून ‘नासा’सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची संधी मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील ३०३ केंद्रप्रमुखांना देण्यात येणाऱ्या टॅबपैकी प्रातिनिधिक स्वरूपात चार केंद्रप्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते टॅब प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शाळेत प्रथमच प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून, फुलांचा वर्षाव करत आणि गुलाबजाम भरवत उत्साहात स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे, शाळेविषयी आपुलकी वाढविणे आणि आनंददायी वातावरणात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करणे हा शाळा प्रवेशोत्सवाचा उद्देश असून उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन


dainik maval jahirat

Previous Post

देहूतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू ; आषाढी वारी पालखी सोहळ्यापूर्वी वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

Next Post

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य - जिल्हा प्रशासनाची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.