व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

लोणावळा शहरात पर्यटकांच्या गर्दीचा फायदा घेत काही ठिकाणी नियमबाह्य कृत्ये केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 16, 2026
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Lonavla-City-Police-Station

Photo Courtesy : File Photo : Lonavla City Police Station


Dainik Maval News : लोणावळ्यातील मुख्य भागात असलेल्या ‘पुराणिक सोसायटी’मधील एका बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या आवाजात संगीत लावून, दारूचे सेवन करत अश्लील कृत्य करणाऱ्या १८ जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ९ पुरुष आणि ७ महिलांसह बंगल्याचा केअरटेकर आणि मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी पहाटे १.३० च्या सुमारास लोणावळा शहर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना भांगरवाडीतील पुराणिक सोसायटीच्या बंगल्यातून (बंगला क्र. १३५) मोठ्या आवाजात गाण्याचा आवाज येत असल्याचे निदर्शनास आले. या आवाजामुळे परिसरातील शांततेचा भंग होत होता. पोलिसांनी तातडीने सदर बंगल्यावर छापा टाकला असता, तिथे अनेक तरुण-तरुणी मद्यपान करत असल्याचे आढळले.

लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पो. कॉ. राहुल चोरगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दारूच्या बाटल्या, रिकामे कॅन आणि आरोपींकडे असलेले महागडे मोबाईल असा एकूण ३ लाख ९० हजार २२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून अश्लील कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय, त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसताना मद्य बाळगणे आणि त्याचे सेवन करणे सुरू होते. विशेष म्हणजे, बंगल्याच्या मालकाने पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा बंगला भाड्याने दिला होता, तर केअरटेकरने या कृत्याला सोयीस्कर मदत केली होती.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे व पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड, रिया राणे, मयूर आबनावे, भूषण कुंवर, राहुल चोरघे, प्रीती गवारी, प्राजक्ता सुतार, सिध्देश्वर शिंदे, आतिष आदलिंगे, तेलंग यांनी ही कारवाई केली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती
– मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?
– महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’
– भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

Next Post

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.