श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे माघ शुद्ध दशमी आणि जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस या निमित्त वसंतपंचमी बुधवारपासून (दि. 14 फेब्रुवारी) अखंड हरीनाम सप्ताह, गाथा पारायण व कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाच्या वातावरणात सुरु आहे. या सोहळ्याची सांगता माघ शुद्ध द्वादशी बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान या काळात ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी अखंड अन्नदान सेवा दिली जात आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
‘अखंड हरीनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सवाला’ भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या लाखो भाविकांची प्रसादाची उत्तम व्यवस्था श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट आणि माघ शुद्ध दशमी समितीच्यावतीने करण्यात आली आहे. पश्चिम दिशेला मंदिराच्या मागील बाजूला ‘संत तुकाराम महाराज महा प्रसादालय’ असा भव्य मंडप उभारण्यात आला असून सकाळच्या न्याहरीपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत या मंडपात अखंडपणे अन्नदान सुरु आहे. (Akhand Harinam Saptah at Bhandara Dongar Food facilities for devotees)
महेंद्र होनावळे व सहकारी यांजकडून महाप्रसाद तयार करण्यात येत असून मावळ, खेड, मुळशी या तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ मंडळी आपापल्या गावाच्या भाकरी डोंगरवर आणून देत आहेत. चाकण, शेल पिंपळगाव, मोशी, तळेगाव येथील भाजीपाला विक्रेत्यांकडून मोफत भाजीपाला व भंडारा डोंगर पंचक्रोशीतील दुध व्यवसायीकांकडून मोफत दुध उपलब्ध होत आहे. मराठवाडा विकास संघाचे अरुण पवार यांच्यावतीने भाविकांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी मोफत टॅन्कर देण्यात आला आहे.
मावळ तालुक्याच्या पश्चिम टोकाला असणाऱ्या बोरीवली आणि खांडी गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळी परंपरेप्रमाणे महाप्रसाद वाटपाची सेवा करत आहे. आळंदी येथील स्वकाम सेवा संघ हा परिसर स्वच्छ ठेवत आपली सेवा पुरवीत आहे. चिखली येथील नेवाळे मंडपचे मालक प्रदीप नेवाळे यांच्यावतीने अत्यंत अल्पदरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी आकर्षक अशी मंडप व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– निमगाव येथील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी लिफ्टची सोय करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश । Pune News
– तळेगाव दाभाडे येथील कैकाडी समाजाच्या समस्या तातडीने सोडवा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश । Talegaon Dabhade
– राज्यात ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वाळू विक्रीचे दर निश्चित करणार; शिंदे सरकारचे एकापेक्षा एक मोठे निर्णय, वाचा सविस्तर