व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, May 16, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

।। राम कृष्ण हरी ।। श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखंड हरीनाम सप्ताह, गाथा पारायण आणि कीर्तन महोत्सवानिमित्त अखंड अन्नदान सेवा

‘अखंड हरीनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सवाला’ भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या लाखो भाविकांची प्रसादाची उत्तम व्यवस्था श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट आणि माघ शुद्ध दशमी समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 16, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Bhandara-Dongar-Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे माघ शुद्ध दशमी आणि जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस या निमित्त वसंतपंचमी बुधवारपासून (दि. 14 फेब्रुवारी) अखंड हरीनाम सप्ताह, गाथा पारायण व कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाच्या वातावरणात सुरु आहे. या सोहळ्याची सांगता माघ शुद्ध द्वादशी बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान या काळात ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी अखंड अन्नदान सेवा दिली जात आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

‘अखंड हरीनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सवाला’ भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या लाखो भाविकांची प्रसादाची उत्तम व्यवस्था श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट आणि माघ शुद्ध दशमी समितीच्यावतीने करण्यात आली आहे. पश्चिम दिशेला मंदिराच्या मागील बाजूला ‘संत तुकाराम महाराज महा प्रसादालय’ असा भव्य मंडप उभारण्यात आला असून सकाळच्या न्याहरीपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत या मंडपात अखंडपणे अन्नदान सुरु आहे. (Akhand Harinam Saptah at Bhandara Dongar Food facilities for devotees)

महेंद्र होनावळे व सहकारी यांजकडून महाप्रसाद तयार करण्यात येत असून मावळ, खेड, मुळशी या तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ मंडळी आपापल्या गावाच्या भाकरी डोंगरवर आणून देत आहेत. चाकण, शेल पिंपळगाव, मोशी, तळेगाव येथील भाजीपाला विक्रेत्यांकडून मोफत भाजीपाला व भंडारा डोंगर पंचक्रोशीतील दुध व्यवसायीकांकडून मोफत दुध उपलब्ध होत आहे. मराठवाडा विकास संघाचे अरुण पवार यांच्यावतीने भाविकांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी मोफत टॅन्कर देण्यात आला आहे.

मावळ तालुक्याच्या पश्चिम टोकाला असणाऱ्या बोरीवली आणि खांडी गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळी परंपरेप्रमाणे महाप्रसाद वाटपाची सेवा करत आहे. आळंदी येथील स्वकाम सेवा संघ हा परिसर स्वच्छ ठेवत आपली सेवा पुरवीत आहे. चिखली येथील नेवाळे मंडपचे मालक प्रदीप नेवाळे यांच्यावतीने अत्यंत अल्पदरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी आकर्षक अशी मंडप व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– निमगाव येथील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी लिफ्टची सोय करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश । Pune News
– तळेगाव दाभाडे येथील कैकाडी समाजाच्या समस्या तातडीने सोडवा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश । Talegaon Dabhade
– राज्यात ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वाळू विक्रीचे दर निश्चित करणार; शिंदे सरकारचे एकापेक्षा एक मोठे निर्णय, वाचा सविस्तर


dainik-maval-ads

Previous Post

खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील ‘या’ आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा होणार सन्मान । MP Shrirang Barne

Next Post

काळीज तोडणारी घटना… धनगव्हाण गावात गोठ्याला आग लागल्याने दोन जनावरांचा होरपळून मृत्यू, साठवलेला चाराही जळाला

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Cowshed-Fire-Maval-Taluka

काळीज तोडणारी घटना... धनगव्हाण गावात गोठ्याला आग लागल्याने दोन जनावरांचा होरपळून मृत्यू, साठवलेला चाराही जळाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

maharashtra-police

पुणे जिल्ह्यात ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात ; मावळमधील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणार अंमलबजावणी

May 15, 2025
Pune District Divisional Commissioner conducts departmental review of pre-monsoon preparations

पुणे जिल्हा : विभागीय आयुक्तांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा विभागस्तरीय आढावा । Pune News

May 15, 2025
Bhushan Ramakrishna Gavai is 52nd Chief Justice of India President Draupadi Murmu administered oath

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई ५२ वे सरन्यायाधीश ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद व गोपनियतेची शपथ

May 15, 2025
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी : राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी ; महसूलमंत्र्यांचे आदेश

May 15, 2025
Crime

मावळ परिसरात गांजा विक्री वाढली ; पोलिसांकडून एकापाठोपाठ एक धडक कारवायांमध्ये गांजा तस्कर अटकेत । Maval Crime

May 15, 2025
100 percent result of Shri Ekvira Vidya Mandir School in Kerla

श्री एकविरा विद्या मंदिर शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के ! ९५.४० टक्क्यांसह स्नेहल शिंदे प्रथम । Karala News

May 15, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.