मनोज जरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची सभागृहाने नोंद घेतली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत सखोल चौकशी करावी, असे निर्देश अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी आहे. हिंसक वक्तव्यांचे समर्थन कुणीही करीत नाही. यामुळे चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी याबाबत सखोल चौकशी करावी, असे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सांगितले. (Investigate Manoj Jarange role through SIT Adv Rahul Narvekar Directed)
या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाजाने यापूर्वी काढलेले मोर्चे शांततेने झाले, तथापि यावेळी तसे घडले नाही. कोणी वैयक्तिक टीका करणार असेल तर सभागृहाने भूमिका घेतली पाहिजे. केवळ जरांगे यांची भूमिका नाही तर त्यांचा बोलविता धनी शोधणे महत्त्वाचे असल्याचे सांगून सर्व चौकशी करून सत्य बाहेर काढले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– अंतरिम अर्थसंकल्पात अजित पवारांची मोठी घोषणा! अयोध्या व श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, 1 लाख महिलांना रोजगार देणार । Maharashtra Interim Budget Session
– माळवाडी गावच्या उपसरपंचपदी पूजा मयुर दाभाडे यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election 2024
– अमृत भारत योजनेअंतर्गत लोणावळा, चिंचवड आणि देहूरोड रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन